07 March 2021

News Flash

रिया चक्रवर्तीचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओमुळे रिया चक्रवर्ती झाली ट्रोल

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे चर्चेत आलेल्या रिया चक्रवर्तीचा एक वादग्रस्त व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रिया चक्रवर्ती ही तिच्या मित्रांसोबत संवाद साधताना दिसते आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे ते समजू शकलेलं नाही. मात्र या व्हिडीओमुळे रिया चांगलीच ट्रोल होते आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आता तिचा हा वादग्रस्त व्हिडीओही समोर आला आहे. ज्यामुळे रिया चक्रवर्ती ट्रोल होते आहे.

काय आहे व्हिडीओत?
या व्हिडीओत रिया चक्रवर्ती खळखळून हसताना दिसते आहे. मित्रांशी संवाद साधताना दिसते आहे तसंच ती असं म्हणते आहे की अपुन ताई है, छोकरा लोगको प्रोड्युसरसे हप्ता लाने को भेजती है. अपुन ताई है.. अपुनको पता है इन लोगोको कैसा मॅन्युपिलेट करना. अपुन गुंडा लोगसे गुंडागिरी करवता है. अपुनका बॉयफ्रेंडभी गुंडेमाफिक समजता है अपने आपको.. ये रेकॉर्ड मत करना.. अपुनको बोलेगा तो अपुन नहीं मानेगा असे काही संवाद आहेत. ती अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बोलताना दिसते आहे. मात्र या व्हिडीओमुळे ती चांगलीच ट्रोल झाली आहे.

पाहा व्हिडीओ

अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणात आता अनेक आरोप होताना दिसत आहेत. सुशांतच्या वडिलांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता या प्रकरणात सुशांतच्या वडिलांची बाजू मांडत असलेले वकील विकास सिंह यांनी आणखी एक धक्कादायक दावा केला आहे. मुंबई पोलिसांतील कुणीतरी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मदत करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ समोर आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 3:29 pm

Web Title: sushant girlfriend ria chakravarty controversial video viral scj 81
टॅग : Sushant Singh Rajput
Next Stories
1 Birthday special : ‘या’ कारणामुळे मुमताज आणि शम्मी कपूर यांच्या नात्याला लागला पूर्णविराम?
2 Sushant Suicide Case: “किती दिवस पळणार? एक दिवस थकून मरशील”
3 प्रसिद्ध संगीतकाराला बलात्काराच्या आरोपाखाली २४ वर्षांची शिक्षा
Just Now!
X