अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी बिहार पोलीस मुंबईत दाखल झाले असून तपास करत आहेत. बिहार पोलीस तपास करण्यासाठी शनिवारी मालवणी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. सुशांतच्या मृत्यूचा त्याची एक्स-मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूशी काही संबंध आहे का? यादृष्टीने बिहार पोलीस शोध घेत आहेत. याचसाठी बिहार पोलीस मालवणी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र यावेळी त्यांनी दिशा सालियनशी संबंधित फोल्डर डिलीट झाल्याचं सांगण्यात आलं. इंडिया टुडेने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

बिहार पोलिसांना दिशाच्या आत्महत्येशी संबंधित फोल्डर चुकून डिलीट झाला असून तो पुन्हा मिळवणं शक्य नाही असं सांगण्यात आलं. पोलीस अधिकारी केसशी संबंधित सर्व माहिती शेअर करण्यास तयार होते. पण एका फोनमुळे परिस्थिती अचानक बदलली. बिहार पोलिसांनी फोल्डर पुन्हा मिळवण्यासाठी मदत देऊ केली, पण त्यांना लॅपटॉप देण्यास नकार देण्यात आला.

What Rupali Chakankar Said?
“बेडकाने छाती फुगवली की त्याला वाटतं आपणं बैल आहोत”, रुपाली चाकणकरांचा अमोल कोल्हेंना टोला
Jayant Patil on Ajit Pawar comparision to Modi- Shah
‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला
atal bihari vajpeyee video
Video: अटल बिहारी वाजपेयींचा ‘तो’ व्हिडीओ पोस्ट करत जितेंद्र आव्हाडांची सूचक टिप्पणी; म्हणाले, “यही सच है!”
Chief Minister Eknath Shinde interacted with MLA Jitendra Awad
मुंबईवरून विधानसभेत खडाजंगी; वर्षा गायकवाड यांच्या पंतप्रधानांवरील टीकेवरून भाजप अस्वस्थ

बिहार पोलीस दिशा सालियन हिच्या कुटुंबीयांचीही चौकशी करणार आहे. जबाब नोंदवण्यासाठी ते पोहोचले होते. पण त्यावेळी घरी कोणी नव्हतं. सुशांतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वीच दिशाने आत्महत्या केली होती. सोबतच सुशांतच्या आत्महत्येनंतर सुशांतची रुम उघडण्यास मदत करणाऱ्या चावीवाल्याचाही शोध सुरु आहे.

८ जूनला दिशाचा मालाड येथे १४ व्या माळ्यावरुन खाली पडून मृत्यू झाला होता. ही आत्महत्या असल्याचा दावा होता. पण पोलिसांनी हा अपघाती मृत्यू असल्याची शंका व्यक्त केली. तर १४ जून रोजी सुशांत सिंहने वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. तपास करण्यासाठी बिहारचे एसपी विनय तिवारी मुंबईत दाखल झाले आहेत.