News Flash

सुशांतच्या एक्स-मॅनेजरच्या मृत्यूशी संबंधित सर्व फाइल्स रेकॉर्डवर, मुंबई पोलिसांची माहिती

मुंबई पोलिसांनी फेटाळलं ते वृत्त

अभिनेता सुशांत सिंहची एक्स-मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूशी संबंधित सर्व फाइल्स व्यवस्थित असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. मुंबई पोलिसांनी फाइल डिलीट झाल्याचं वृत्त फेटाळलं आहे. दिशाच्या मृत्यूशी संबंधित कोणतीही फाइल डिलीट झालेली नसून, रेकॉर्डवर आहे असं मुंबई पोलिसांनी सांगितलं असल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.

अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी बिहार पोलीस मुंबईत दाखल झाले असून तपास करत आहेत. बिहार पोलीस तपास करण्यासाठी शनिवारी मालवणी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. सुशांतच्या मृत्यूचा त्याची एक्स-मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूशी काही संबंध आहे का? यादृष्टीने बिहार पोलीस शोध घेत आहेत. याचसाठी बिहार पोलीस मालवणी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र यावेळी त्यांनी दिशा सालियनशी संबंधित फोल्डर डिलीट झाल्याचं वृत्त देण्यात आलं होतं. हे वृत्त मुंबई पोलिसांनी फेटाळलं आहे.

बिहार पोलीस दिशा सालियन हिच्या कुटुंबीयांचीही चौकशी करणार आहे. जबाब नोंदवण्यासाठी ते पोहोचले होते. पण त्यावेळी घरी कोणी नव्हतं. सुशांतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वीच दिशाने आत्महत्या केली होती. सोबतच सुशांतच्या आत्महत्येनंतर सुशांतची रुम उघडण्यास मदत करणाऱ्या चावीवाल्याचाही शोध सुरु आहे.

८ जूनला दिशाचा मालाड येथे १४ व्या माळ्यावरुन खाली पडून मृत्यू झाला होता. ही आत्महत्या असल्याचा दावा होता. पण पोलिसांनी हा अपघाती मृत्यू असल्याची शंका व्यक्त केली. तर १४ जून रोजी सुशांत सिंहने वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. तपास करण्यासाठी बिहारचे एसपी विनय तिवारी मुंबईत दाखल झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 9:32 pm

Web Title: sushant singh case mumbai police denied reports of deleted disha salian file by mistake sgy 87
Next Stories
1 सुशांतच्या एक्स-मॅनेजरची फाइल चुकून डिलीट झाली, महाराष्ट्र पोलिसांची बिहार पोलिसांना माहिती
2 सुशांत सिंह प्रकरण: अभिनेते शेखर सुमन आणि आस‍िफ भामला यांनी घेतली राज्यपालांची भेट, सीबीआय चौकशीची मागणी
3 विरारमध्ये जखमी अवस्थेत आढळला दुर्मिळ ‘ब्राउन बुबी’ सागरी पक्षी
Just Now!
X