News Flash

एनसीबीची मोठी कारवाई, रिया चक्रवर्तीच्या भावाला चौकशीसाठी घेतलं ताब्यात

सुशांतचा मॅनेजर सॅम्यूअल मिरांडाही ताब्यात

संग्रहित (PTI)

अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाकडून (एनसीबी) आज सकापासून वेगवान कारवाई सुरु आहे. सुशांतचा मॅनेजर सॅम्यूअल मिरांडाला ताब्यात घेतल्यानंतर एनसीबीने रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती यालाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. एनसीबीकडून सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास रिया चक्रवर्तीच्या घरावर धाड टाकण्यात आली होती. चार तासांच्या झाडाझडतीनंतर एनसीबीकडून ही कारवाई करण्यात आली. शौविकचा लॅपटॉपही जप्त करण्यात आला असल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

एनसीबीने आतापर्यंत चार अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक याचे अमली पदार्थ तस्कर, विक्रेत्यांसोबत संबंध स्पष्ट झाल्याचा दावा एनसीबीने केला आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड तसंच मुंबईतील उच्चभ्रू ग्राहकांना गांजा विकणाऱ्या अब्बास लखानी, करण अरोरा, झैद विलात्रा आणि बसीत परिहार या चार तरुणांना अटक करण्यात आली आहे. शोविक अमली पदार्थ विकणाऱ्यांच्या संपर्कात होता, हे त्यांच्या चौकशीतून स्पष्ट झालं आहे.

आणखी वाचा- शोविक चक्रवर्तीचे अमली पदार्थ विक्रेत्यांशी संबंध स्पष्ट

आणखी वाचा- सुशांतच्या मॅनेजरला एनसीबीने घेतलं ताब्यात, अडीच तासांच्या झाडाझडतीनंतर कारवाई

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी बुधवारी एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणात तपास करणारी एनसीबी ही तिसरी केंद्रीय यंत्रणा आहे. मुंबई पोलीस, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) प्रमाणे एनसीबीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचा दावा रियाने अ‍ॅड. सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2020 10:49 am

Web Title: sushant singh death case ncb detained rhea chakrabprty brother sgy 87
Next Stories
1 शोविक चक्रवर्तीचे अमली पदार्थ विक्रेत्यांशी संबंध स्पष्ट
2 रोजंदारीवरील चालक-वाहकांना दिलासा
3 सुशांतच्या मॅनेजरला एनसीबीने घेतलं ताब्यात, अडीच तासांच्या झाडाझडतीनंतर कारवाई
Just Now!
X