News Flash

सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडाला एनसीबीकडून अटक

दोघांच्याही घरावर टाकला होता छापा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर नवी माहिती समोर आली होती. दरम्यान, ड्रग्स कनेक्शनशी निगडीत एनसीबीद्वारे मोठी कारवाई केली सुरू आहे. एनसीबीनं रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती याच्यासह सॅम्युअल मिरांडाला अटक केली आहे. यापूर्वी एनसीबी आज कोणतीही अटक होणार नसल्याचं सांगितलं होतं. परंतु एनसीबीच्या चौकशीनंतर त्यांना काही कायदेशीर बाबींची पूर्तता करून अटक करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी सॅम्युअल मिरांडाच्या घरावर एनसीबीनं छापा टाकला होता आणि चौकशीसाठी शोविकलाही सोबत नेलं होतं.

शोविकला लवकरच अटक होऊ शकते असं असं एनसीबीचे उप-महासंचालक केपीएस मल्होत्रा यांनी सांगितलं होतं. सकाळपासूनच शोविकच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार होती. रियाच्या घरावर छापा टाकल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोची टीम शौविक चक्रवर्तीला सोबत घेऊन गेली होती. शोविकची ड्रग पेडलरसोबत चौकशी करण्यात आली होती.

सुशांत प्रकरणी आज सकाळपासूनच एनसीबी अॅक्शन मोडमध्ये होती. पहिल्यांदाच कोणती टीप तपासासाठी रियाच्या घरी पोहोचली होती. तसंच त्यांची चौकशीही करण्यात आली. त्यानंतर एनसीबीची टीम आपल्यासोबत शोविकला घेऊन गेली होती. याप्रकरणी ड्रग्स कनेक्शनबाबत नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोनं शोविक सोबत अटक केलेल्या ड्रग पॅडलर बासित आणि झैद यांचीही चौकशी केली. सर्वांना एकत्र बसवून त्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाचीही कसून चौकशी करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2020 9:46 pm

Web Title: sushant singh rajput case rhea chakraborthy brother showik samual miranda arrested jud 87
Next Stories
1 “…हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा,” कंगनाच्या आव्हानाला संजय राऊतांचं प्रत्युत्तर
2 कंगनाच्या पाठीमागे राहून वार करण्याची गरज नाही, आशिष शेलारांची संजय राऊतांवर टीका
3 गंभीर आजाराच्या रुग्णांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या, अमित ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Just Now!
X