News Flash

वांद्रे पोलिसांकडून सुशांत सिंगच्या कथित गर्लफ्रेंडची कसून चौकशी

वांद्रे पोलिसांनी नोंदवला रिया चक्रवर्तीचा जबाब

सुशांत सिंह राजपूत, रिया चक्रवर्ती

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी केली असून जबाब नोंदवला आहे. पोलिसांनी रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. यानंतर रिया चक्रवर्ती गुरुवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास वांद्रे पोलीस ठाण्यात पोहोचली होती. पोलिसांनी रिया चक्रवर्तीचा जबाब नोंदवला असून सहा तासांपासून अधिक वेळ चौकशी करण्यात आली.

रिया चक्रवर्ती आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत पोलीस ठाण्यात पोहोचली होती. सुशांत आणि रिया एकमेकांना डेट करत होते अशी माहिती आहे. तसंच दोघे वर्षाच्या अखेर लग्न करणार होते असंही सांगितलं जात आहे. पोलिसांनी आतापर्यंत १० जणांचे जबाब नोंदवले आहेत.

सुशांत सिंहने मानसिक तणावाखाली आत्महत्या केल्याची चर्चा असून बॉलिवूडमधील अनेक मोठ्या सेलिब्रेटींना यासाठी जबाबदार धरलं जात आहे. पोलीस बॉलिवूडमधील शत्रुत्व सुशांतच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलं का यादृष्टीनेही तपास करत आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तशी माहिती दिली आहे. रिया चक्रवर्तीकडे यासंबंधी अधिक माहिती असल्याची शक्यता असल्याने पोलीस तिची कसून चौकशी करत असल्याची माहिती आहे.

१४ जून रोजी सुशांत सिंहने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईट नोट सापडलेली नाही. त्यामुळे आत्महत्येचं नेमकं कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 8:47 pm

Web Title: sushant singh rajput suicide case rhea chakraborty at bandra police station to record her statement sgy 87
Next Stories
1 लवकरच सुरु होणार कपिल शर्मा शोचं शुटींग, कोण असणार पहिला गेस्ट?
2 अभिनेत्याने केली सुशांतच्या बायोपिकची घोषणा; बॉलिवूडमधील घराणेशाहीला करणार एक्सपोज
3 सुशांतच्या आत्महत्येनंतर साहिल खानने सांगितलं बॉलिवूड सोडण्यामागचं कारण
Just Now!
X