26 January 2021

News Flash

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या बातमीने धक्का बसला – प्रिया मराठे

सुशांत अत्यंत हुशार, समर्पणवृत्तीने काम करणारा कलाकार होता

“अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं असं अचानक आपल्यातून निघून जाणं माझ्यासाठी धक्कादायक आहे. मला काहीच कळत नाहीय” अशी प्रतिक्रिया अभिनेत्री प्रिया मराठे यांनी दिली. प्रिया मराठे आणि सुशांत सिंह राजपूत यांनी ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं.

“सुशांतच्या निधनाच्या बातमीने मला धक्का बसला आहे. तो एक अत्यंत हुशार, समर्पणवृत्तीने काम करणारा कलाकार होता. आपल्याला पुढे जाऊन काय कारयचं आहे, चित्रपटात काम करायचं आहे, हे त्याला ठाऊक होतं. त्यावेळी आम्ही हा विचारही केला नव्हता. तो खूप शार्प आणि हुशार होता” असे प्रिया मराठे यांनी सांगितले. त्या एबीपी माझा वृत्त वाहिनीवर बोलत होत्या.

“सुशांतच्या मेकअप रुममध्ये त्याची स्क्रिपट, पुस्तक असाय़ची. तो पुस्तक भरपूर वाचायचा” असे प्रिया मराठेने सांगितले. “सेटवर प्रत्येक सीनवर त्याची कमांड होती. सीनमधलं एखादं वाक्य पाठ नाही असं त्याच्याबाबतीत कधीचं झालं नाही” असे प्रियाने सांगितले. “पवित्र रिश्ताच्या सेटवर आमच्यात चांगल मैत्रीचं नातं तयार झालं होतं. तो खूप चांगला, प्रेमळ माणूस आणि सहकलाकार होता” अशा आठवणी प्रिया मराठे यांनी सांगितल्या.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2020 3:17 pm

Web Title: sushant singh rajput suicide is shocking news for me priya marathe dmp 82
Next Stories
1 अभिनेता सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
2 मुंबई : लोकल ट्रेन पुन्हा सुरू होणार?, मध्य रेल्वेने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण
3 मुंबई : इमारतीवर चढून पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न, दादरमध्ये चार तास सुरु होता थरार
Just Now!
X