News Flash

सुशांत सिंहची हत्याच झालीये; नारायण राणे यांचा दावा

याप्रकरणी राज्य सरकार कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असाही आरोप त्यांनी केला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली आहे, असा दावा भाजपा नेते नारायण राणे यांनी केलं आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी गंभीर आरोप करत राज्य सरकारवर टीका केली आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात राज्य सरकार कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे.

“सुशांतची आत्महत्या नसून ही हत्याच आहे. पोलीस योग्य दिशेनं तपास करत नाही. याप्रकरणी पाटणामध्ये एफआयआर दाखल झाली. मात्र मुंबई पोलिसांनी अजून एफआयआर दाखल केली नाही. गेल्या ५० दिवसांत मुंबई पोलिसांनी आरोपींचा शोध का लावला नाही,’ असा सवाल राणेंनी उपस्थित केला. या प्रकरणाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचीही टीका त्यांनी केली.

आणखी वाचा- “सुशांत सिंहच्या असिस्टंट मॅनेजरची बलात्कार करून हत्या”; नारायण राणे यांचा गौप्यस्फोट

या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूबाबतही गंभीर आरोप केले आहेत. “दिशा सालियन आत्महत्या प्रकरणाचा तपास का झाला नाही. तिला शवविच्छेदन अहवाल माझ्याकडे आहे. तिने आत्महत्या केली नसून तिचीसुद्धा हत्या करण्यात आली आहे. दिशावर बलात्कार करून तिला ठार मारण्यात आले आहे”, असा आरोप राणेंनी केला आहे.

आणखी वाचा- “रियासोबत युरोपला जाऊन आल्यापासून सुशांत बदलला”; माजी सहाय्यकाने केले धक्कादायक खुलासे

सुशांतने १४ जून रोजी मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं कारण नेमकं समजू शकलेलं नाही. मुंबई व बिहार पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 6:16 pm

Web Title: sushant was murdered maha govt saving someone narayan rane ssv 92
Next Stories
1 “…ही तर चाकरमान्यांची फसवणूक; परिवहन मंत्र्यांचं वरातीमागून घोडं”
2 “असुरक्षित वाटत असेल तर अमृता फडणवीस यांनी राज्य सोडून जावे”
3 ‘कस्तुरबा’त उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाची साथरोग आजार व प्रतिकारशक्ती शास्त्र संशोधन संस्था!
Just Now!
X