केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका देत त्यांचे जातप्रमाणपत्र नुकतेच रद्द केले. परंतु न्यायालयाने त्यांना शुक्रवारी (२८ मार्चला) पुन्हा जातपडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले असल्याने त्यांना दिलासाही मिळाला आहे. त्यामुळे या निकालाचा सध्या तरी शिंदे यांच्या उमेदवारीवर परिणाम होणार नसल्याचे म्हटले जात आहे.
शिंदे यांच्या जातप्रमाणपत्राला महायुतीचे बंडखोर उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. जातपडताळणी समितीने कुठलेही कारण न देता २००९ मध्ये शिंदे यांना हे प्रमाणपत्र दिल्याचा दावा गायकवाड यांनी केला होता. जातप्रमाणपत्र का दिले वा नाकारले जात आहे याचे कारण समितीने देणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. त्यामुळे न्यायालयाने याच मुद्दय़ावर शिंदे यांचे जातप्रमाणपत्र गेल्याच आठवडय़ात रद्दबातल ठरवले. परंतु जातपडताळणी समितीसमोर नव्याने आपली चौकशी करावी आणि मग जातप्रमाणपत्राचा निर्णय घेऊ द्यावा, अशी विनंती शिंदे यांच्या वतीनेच न्यायालयाकडे करण्यात आली. न्यायालयाने त्यांची ही मागणी मान्य करीत २८ मार्च रोजी शिंदे, याचिकाकर्ते यांनी जात पडताळणी समितीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच समितीला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देत गरज वाटल्यास दक्षता समितीचा अहवाल मागविण्याचे आदेश दिले आहेत. दोन महिन्यांच्या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Nagpur became the center point of mahayuti 15 leaders met
नागपूर ठरले महायुतीचे केंद्रबिंदू, १५ नेत्यांनी घेतली भेट
BJP Retain Support uttam jankar, madha lok sabha seat, uttam jankar, dhairyasheel mohite patil, NCP sharad pawar group, devendra fadnavis, amit shah,
माढ्यात नुकसान नियंत्रणासाठी देवेंद्र फडणवीस सरसावले, नाराज उत्तम जानकरांना विशेष विमानाने मुंबईत पाचारण
mumbai, devendra fadnavis marathi news, personal assistant of dcm devendra fadnavis marathi news
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक असल्याची बतावणी करून १५ लाखांची फसवणूक, दोघांना अटक
Arvind Kejriwal wife Sunita Kejriwal
“मोदींनी अहंकारातून…”, अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी व्यक्त केला संताप