माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर जाऊन त्यांनी भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा सुरु होता. विशेष म्हणजे याआधीही मे महिन्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर राजू शेट्टींनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे लगेचच पुन्हा राजू शेट्टी राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत ४९ जागा लढवणार
एका पराभवाने सर्व संपले असे नाही : राजू शेट्टी
या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी सांगितलं की, “राज ठाकरे यांच्यासोबत वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सर्व भाजपाविरोधी पक्षांचा पर्याय निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असून त्यासंबंधी चर्चा करण्यासाठीच राज ठाकरे यांची भेट घेतली. महाआघाडीत मनसेला घ्यायला काँग्रेसचासुद्धा विरोध मावळेल अशी आशा आहे”.
माझ्याशिवाय विधानसभा निवडणूक लढवण्यास संघटनेकडे सक्षम उमेदवार : राजू शेट्टी
राजू शेट्टींनी घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
दरम्यान राजू शेट्टी यांनी बुधवारी बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना ४९ जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. ही निवडणूक महाआघाडीतून की स्वबळावर लढवायची याबाबत ऑगस्ट महिन्यात राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली होती. संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात झाली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत शेट्टी यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले,की आगामी विधानसभेच्या ४९ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या जागा महाआघाडी की स्वबळावर याचा निर्णय झालेला नाही. मात्र, मी निवडणूक लढवणार नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 4, 2019 2:16 pm