आयझॉल पावडरमुळे नागरिक त्रस्त; आरोग्याला धोका

‘स्वच्छ भारत अभियाना’मध्ये रस्ते चकाचक व्हावेत, संपूर्ण परिसर र्निजतूक व्हावा यासाठी पालिकेच्या ‘सी’ विभाग कार्यालयाने आपल्या हद्दीमध्ये आयझॉल या कीटकनाशकाची अक्षरश: उधळणच सुरू केली असून धुळवडीपूर्वीच पालिकेने आयझॉलची उधळून रस्ते, पदपथ लालेलाल करुन टाकले आहेत. रस्त्यावरील वाहतुकीमुळे आयझॉल पावडर उडून दुकाने आणि नागरिकांच्या घरात जाऊ लागली आहे. ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या निमित्ताने सुरू केलेल्या कीटकनाशकांच्या फवारणीमुळे नागरिकांचे आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. मात्र त्याची चिंता न बाळगता ‘सी’ विभाग कार्यालयाने कीटकनाशकाची मुक्त हस्ते उधळण सुरूच ठेवली आहे.

High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
tuberculosis tb patients marathi news, pm narendra modi tb medicines marathi news
औषधांच्या तुटवड्यासंदर्भात क्षयरुग्णांचे पंतप्रधानांना पत्र
Queues at reservation centers due to technical glitch in STs app
एसटीच्या ॲपमधील तांत्रिक बिघाडामुळे आरक्षण केंद्रांवर रांगा

‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत करण्यात आलेल्या स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्रातील अधिकारी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यामुळे पालिकेने संपूर्ण मुंबईत जोरदार स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर रस्त्यावर कचऱ्याचे ढिग साचू नये, रस्त्यांवर प्रात:विधी उरकले जाऊ नयेत, वस्त्या-झोपडपट्टय़ांमध्ये स्वच्छता राखली जावी यावर पालिकेचे अधिकारी कटाक्षाने लक्ष ठेऊन आहेत. त्याचबरोबर मुंबईकरांनी मोठय़ा संख्येने आपल्या मोबाइलमध्ये ‘स्वच्छता’ अ‍ॅप डाऊनलोड करुन कचऱ्याची छायाचित्र टिपून त्यावर पाठवावी यासाठी पालिका अधिकाऱ्यांची धडपड सुरू आहे. कचरा वेचकांची मोठय़ा प्रमाणावर नोंदणी करुन त्यांना ओळखपत्र देण्यावरही पालिकेने भर दिला आहे. त्यासाठी कचरा वेचकांचा युद्धपातळीवर शोध सुरू करण्यात आला आहे. एकूणच यंदा ‘स्वच्छ भारत अभियाना’त मुंबईचा क्रमांक घसरू नये म्हणून पालिका अधिकारी कामाला लागले आहेत.

अस्वच्छतेमुळे ‘स्वच्छ भारत अभियाना’त फटका बसू नये म्हणून ‘सी’ विभाग कार्यालयाने युद्धपातळीवर सफाई मोहीम हाती घेतली आहे. मात्र या सफाई मोहिमेत ‘सी’ विभाग कार्यालयाने तर ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी अतिरेकच सुरू केला आहे. आपला विभाग काही तरी वेगळे करीत असल्याचे दाखविण्यासाठी संपूर्ण परिसरामध्ये सकाळी आयझॉल पावडरची उधळणच करण्यात येत आहे. या उधळणीतून छोटय़ा गल्ल्याही सुटलेल्या नाहीत. त्यामुळे पदपथ आणि रस्ते लालेलाग होऊन गेले आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवरही पावडरचे थर चढू लागले आहेत. पादचाऱ्यांना आयझॉल तुडवतच चालावे लागत आहे. वाहतुकीमुळे रस्त्यावरील आयझॉल पावडर उडू लागली असून रस्त्यावर विकला जाणारा भाजीपाला, फळ, खाद्यपदार्थावर ती बसू लागली आहे. या परिसरातील रहिवाशी आणि दुकानदारांना या कीटकनाशकाचा मोठा त्रास होऊ लागला आहे. आणखी काही दिवसांनी या परिसरात आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे.

काय आहे आयझॉल पावडर?

मुंबईमध्ये साफसफाई केल्यानंतर सफाई कामगार नियोजित ठिकाणी कचरा साचवून ठेवतात. कचरा उचलून वाहनात भरल्यानंतर त्या ठिकाणी लाल रंगाची आयझॉल आणि पांढऱ्या रंगाची ब्लिचिंग पावडर टाकण्यात येते. खचरा उचलून नेल्यानंतर त्यातील पाण्यामुळे रस्ता ओला होता. काही वेळा कचऱ्यातील घाणेरडय़ा पाण्यामुळे चिखल होतो. असा वेळी त्यावर आयझॉल पावडर टाकण्यात येते.

स्वच्छतेसाठी परिसरात आयझॉल पावडर टाकण्यात आली होती. पण आता ही पावडर टाकण्याचे थांबविण्यात आले आहे. मोठय़ा प्रमाणावर लाल रंग असलेली ही पावडर घेण्याचे पालिकेने बंद केले आहे.    – जीवक संतोष घेगडमल, सहाय्यक आयुक्त, ‘सी’ विभाग