21 January 2019

News Flash

महाराष्ट्र देशातील दुसरे स्वच्छ राज्य ; मुंबईस सर्वात स्वच्छ राजधानीचा मान

वेगवेगळ्या नऊ  विभागांत राज्यातील शहरांना स्वच्छ शहरांचे सर्वोत्कृष्ट पारितोषिके जाहीर झाली आहेत.

मुंबई : देशातील स्वच्छ राजधानीचा मान मुंबईस मिळाला असून घनकचरा व्यवस्थापनातील सर्वोत्कृष्ट महापालिकेचा पुरस्कार नवी मुंबई महापालिकेस जाहीर झाला आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला असून त्यात देशातील दुसरे सर्वोत्कृष्ट राज्यासह विविध विभागांत १०  शहरे स्वच्छ  ठरली असून यातील ६ शहरांना राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरी भागातील स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ४ जानेवारी  ते १० मार्च  या कालावधीत देशातील चार हजार २०३ शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या स्पर्धेत झारखंड राज्याने सर्वोत्कृष्ट राज्याचे पहिले पारितोषिक मिळवले तर महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला आहे. तर छत्तीसगडने तिसरा क्रमांक मिळविला आहे. तर देशातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहराचा मान इंदूर शहराने पटकावला आहे.

गृहनिर्माण व नागरी व्यवहार राज्यमंत्री (स्वंतत्र प्रभार) हरदीपसिंग पुरी यांनी आज नवी दिल्लीत ही घोषणा केली.

वेगवेगळ्या नऊ  विभागांत राज्यातील शहरांना स्वच्छ शहरांचे सर्वोत्कृष्ट पारितोषिके जाहीर झाली आहेत.

तीन लाख ते १० लाख लोकसंख्येच्या शहरामध्ये सर्वात अधिक गतीने स्वच्छतेकडे वाटचाल करणाऱ्या शहरांमध्ये भिवंडी-निजामपूर शहरास प्रथम क्रमांक मिळाला तर छोटय़ा शहरामध्ये (एक ते तीन लाख लोकसंख्या) भुसावळ शहराने पारितोषिक पटकावले आहे. पश्चिम क्षेत्रातील एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांमधील स्वच्छ शहराचा मान पाचगणीने तर नागरिक प्रतिसाद विभागातील सर्वोत्कृष्ट शहराचा मान अमरावती जिल्ह्य़ातील शेंदूरजनाघाट शहराने मिळविला आहे. उत्कृष्ट नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा मान सासवडला मिळाला आहे.

* वेगवेगळ्या नऊ  विभागांत राज्यातील शहरांना स्वच्छ शहरांचे सर्वोत्कृष्ट पारितोषिके जाहीर झाली आहेत.

* सर्वात स्वच्छ राजधानीचा मान मुंबई शहरास मिळाला आहे.

* तर नावीन्यपूर्ण विभागात दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये नागपूरला नावीन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैलीचा प्रथम क्रमांक मिळाला आहे.

* नागरिक प्रतिसादात देशातील अव्वल शहराचा मान परभणीस मिळाला आहे.

First Published on May 17, 2018 3:34 am

Web Title: swachh survekshan 2018 rankings mumbai cleanest state capital