गुंतवणूक म्हणजे क्लिष्ट विषय. त्यात अर्थसाक्षरताच मुळात कमी असणाऱ्या आपल्या समाजात गुंतवणूक क्षेत्रात महिलांचे प्रमाण अत्यंत कमी; परंतु अशा परिस्थितीत हे क्षेत्र आपल्या ज्ञान आणि कर्तबगारीने काबीज करणाऱ्या आणि तब्बल ८३०० कोटींच्या समभाग संबंधित निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या स्त्रीकडून अर्थजाणिवा नव्याने विकसित करण्याची संधी मिळणार आहे. ‘यूटीआय’च्या स्वाती कुलकर्णी यांना व्हिवा लाउंजमध्ये आमंत्रित करण्यात आले आहे. देशातील आघाडीच्या म्युच्युअल फंड मॅनेजरपकी एक असा नावलौकिक असणाऱ्या स्वाती कुलकर्णी यांच्याशी थेट संवादाचा हा कार्यक्रम आज, मंगळवारी दुपारी साडेचार वाजता दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात होईल.

कुठे – स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.), मुंबई<br />कधी – आज
वेळ – सायंकाळी ४.३०
कार्यक्रम सर्वासाठी खुला.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य.