06 March 2021

News Flash

स्वाइन फ्लू रुग्णांचे प्रमाण वाढीला

त्यातच जुलैच्या पहिल्या तीन आठवडय़ांत रोज सरासरी पाच रुग्ण आढळत होते. मात्र गेल्या आठवडय़ात सरासरी दहा रुग्णांची नोंद झाली.

| July 31, 2015 01:53 am

पावसाच्या दुसऱ्या टप्प्यानंतर लेप्टोची साथ बळावली नसली तरी स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. गेल्या आठवडाभरात स्वाइन फ्लूच्या आणखी ७० रुग्णांची नोंद झाली असून एक व्यक्ती दगावला आहे. त्यातच जुलैच्या पहिल्या तीन आठवडय़ांत रोज सरासरी पाच रुग्ण आढळत होते. मात्र गेल्या आठवडय़ात सरासरी दहा रुग्णांची नोंद झाली. जुलैमधील स्वाइन फ्लूच्या मृत्यूंची संख्या आठवर गेली असून या वर्षभरातील मृत्यूंची अधिकृत संख्या २७ वर पोहोचली.

जूनमध्ये शहरात स्वाइन फ्लूचे केवळ १९ रुग्ण आढळले होते. मात्र २९ जुलैपर्यंत शहरातील रुग्णांची संख्या १८४ वर पोहोचली आहे. महत्त्वाचे म्हणजे २३ जुलैपर्यंत ही संख्या ११४ म्हणजे दिवसाला सरासरी पाचने वाढत होती मात्र गेल्या आठवडय़ाभरात दररोज सरासरी दहा रुग्णांना स्वाइन फ्लूचे निदान होत आहे. दरम्यान लेप्टोच्या साथीच्या रुग्णांची संख्या ७५ वर मर्यादित राहिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 1:53 am

Web Title: swine flue patient dead
टॅग : Patient
Next Stories
1 हवामान खात्यातील डॉप्लर रडार बंद का? उच्च न्यायालयाची प्रश्नांची सरबत्ती
2 मासेमारी नौकांच्या नोंदीसाठी टोकन पद्धती खडसे यांची घोषणा
3 दिग्दर्शकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ
Just Now!
X