दै. ‘लोकसत्ता’च्या ‘दहावीनंतर काय?’ या शैक्षणिक उपक्रमाचा शुभारंभ १० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता वाशीत आयोजित केलेल्या एका विशेष परिसंवादाने होणार आहे. वाशीच्या विष्णुदास भावे नाटय़गृहात होणाऱ्या या कार्यक्रमात दहावीनंतरच्या उच्च शिक्षणविषयक विविध पर्यायांवर मार्गदर्शन करण्यात येईल. परिसंवादाला ‘ग्रोथ सेंटर’च्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती साळुंखे, मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे, ‘स्टील फ्रेम सिव्हिल इंडिया’चे संचालक फारुख नाईकवाडे मार्गदर्शन करणार आहेत.
हा कार्यक्रम ‘लोकसत्ता’ने ‘यूएसआर ग्रुप’च्या सहकार्याने आयोजित केला असून या कंपनीचे संचालक महेंद्र मेहता व सुल्तान मालदार हेही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका ५ ते ७ एप्रिल रोजी स. १०.३० ते दुपारी १२.३० व सायं. चार ते सात या वेळेत विष्णुदास भावे सभागृहात उपलब्ध होतील. अधिक माहितीसाठी समीर म्हात्रे (लोकसत्ता प्रतिनिधी) ०९०२१७८३४०८, इक्बाल कवारे (प्रमुख समन्वयक) ०९८१९४४५०५५ यांच्याशी संपर्क साधावा