मुंबई आयआयटी ‘टेकफेस्ट’मध्ये तंत्रयुगाची सफर
भिंतीवर चालणारे रोबोट, पाण्यात पोहणारे रोबोटीक मासे, स्वंयचलित बुद्धीबळ, वस्तू तयार करणारे त्रिमिती (थ्रीडी) िपट्रर, कॅमेरे असलेले ड्रोन अशा अनेक तंत्रज्ञानाचा प्रवास शनिवारी आयआयटीतील १९ व्या ‘टेकफेस्ट’मध्ये मुंबईकरांनी अनुभवला. मुंबई आयआयटीची महाराष्ट्रव्यतिरिक्त इतर राज्यांतील विद्यार्थीही आतुरतेने वाट बघत असतात. यावेळी ‘टेकफेस्ट’मध्ये देशभरातील २५०० महाविद्यालये सहभागी झाली. पहिल्या दिवशी एकूण ४५ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आणि चाहते सहभागी झाले होते.
‘रोबोवॉर’ हा नेहमीच टेकफेस्टच्या चाहत्यांचा आकर्षणाचा विषय असला तरी यावेळी थ्रीडी पिट्रर प्रयोगाने बाजी मारली. या थ्रीडी िपट्ररच्या (त्रिमिती) साहाय्याने विविध आकाराच्या वस्तू तयार केल्या जाऊ शकतात याचे प्रात्यक्षिक यावेळी चाहत्यांना पाहायला मिळाले. एच.डी कार्डच्या मार्फत वस्तूचा आकार किंवा नक्षीकाम थ्रीडी सॉफ्टवेअरमध्ये टाकून लहान लहान भाग या पिट्ररच्या माध्यमातून तयार केले जातात. यातून आकाराचा एक एक थर तयार केला जातो. या मशिनची किंमत चार लाखांपर्यंत असली तरी बाजारात याचा वापर व्हावा या उद्देशाने याची किंमत ६० ते ७० हजारांपर्यंत आहे. या वस्तू प्लास्टिक आणि मेटलच्या सहाय्याने तयार केल्या आहेत. यावेळी प्रदर्शनासाठी या पिट्रपासून तयार केलेल्या वस्तू, रोबोच्या मूर्ती असे अनेक आकार प्रदर्शनासाठी ठेवले आहेत. परदेशातीलही विविध प्रकारचे प्रयोग सादर करण्यात आले होते. बांगलादेशातील विद्यार्थ्यांनी तीन प्रकारचे रोबो तयार केले असून या रोबोंचा उपयोग आपत्कालीन परिस्थितील केला जाऊ शकतो. प्रदर्शनाव्यतिरिक्त तंत्रज्ञान व विज्ञान क्षेत्रातील देशभरातील हजारो विद्यार्थी या महोत्सवात सहभागी झाले होते. यात शेतमालाची दीर्घकाळ साठवणूक करण्यासाठी उपयोगी पडणारा ‘शीत’ वातानुकूलन यंत्रणा, मंगळावर जीवसृष्टीच्या अस्तित्त्वाबाबत झालेल्या संशोधनावर आधारित सादरीकरण, जास्तीत जास्त वस्तुमानाचा भार वाहवू शकणारे लाकडी काडय़ांचे पूल असे अनेक प्रयोग सादर करून या स्पर्धामंध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी आय.आय.टीचे वातावरण उत्साहाबरोबर तंत्रयुगात रमले होते. यावेळी कित्येक पालक आपल्या मुलांना या महोत्सवाच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देत होते.
आय.आय.टी.च्या मोठ्या कॅम्पसमध्ये रस्त्याच्या दुतर्फा असलेले रोबो, मध्येच रस्त्याच्या मध्यभागी असलेली अंतराळातील तबकडी, उडणारे एलीयन, काही ठिकाणी सुरू असलेले पंचमिती खेळ यामुळे आय.आय.टी. तंत्रज्ञानाच्या युगाच गेल्यासारखे भासत होते.

लोकांचा हिरमोड
आयआयटी प्रदर्शनासाठी तुडुंब गर्दी असल्याने प्रदर्शनाची वेळ निघून गेल्यानंतरही प्रदर्शनाची रांग कमी होत नव्हती. रांगेत ६०० लोक असतानाही प्रदर्शन बंद करण्यात आले. त्यामुळे आलेल्या अनेक लोकांचा हिरमोड झाला.