News Flash

तारक मेहता का उलटा चष्मा मालिका लिहिणारे अभिषेक मकवाना यांची आत्महत्या

कर्ज घेतल्यानंतर अभिषेक यांना ब्लॅकमेल केलं जात होतं असा कुटुंबीयांना संशय

तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका लिहिणारे लेखक अभिषेक मकवाना यांनी आत्महत्या केली आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका आहे. या मालिकेचे लेखक अभिषेक मकवाना यांनी आत्महत्या केली. अभिषेक यांनी कर्ज घेतल्यानंतर त्यांना ब्लॅकमेल केलं जात होतं, त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं असावं असा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

अभिषेक मकवाना यांना कर्ज घेतल्यापासून फोनवरुन धमक्या दिल्या जात होत्या. कर्ज फेडण्यासाठी त्यांच्यावर वारंवार दबाव आणला जात होता. अभिषेक मकवाना हे सायबर फ्रॉडचे बळी ठरले असंही त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

अभिषेक मकवाना यांचा मृत्यू हा अपघाती झाला आहे अशी नोंद आधी चारकोप पोलिसांनी केली होती. मात्र आता ही आत्महत्या असल्याचं समोर आलं आहे. २७ नोव्हेंबरला अभिषेक मकवाना यांनी आत्महत्या केली. यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरातल्यांचे जबाब नोंदवले आहेत.

काय म्हटलं आहे अभिषेक यांच्या भावाने?
अभिषेकचा मृत्यू झाल्यानंतर मी त्याचे काही मेल चेक केले. त्यामध्ये अभिषेकला अनेक नंबर्सवरुन फोन येत असल्याचं समजलं. तसंच ते सगळे फोन कॉल्स कर्ज फेडण्यासंदर्भातले होते. एक कॉल बांगलादेशातून तर एक कॉल म्यानमारमधून आल्याचंही मला समजलं. तर इतर कॉल्स भारतातल्या इतर भागांमधून येत होते असंही समजलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 5:22 pm

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah writer abhishek makwana dies by suicide scj 81
Next Stories
1 बेस्टच्या २६ एसी इलेक्ट्रीक बसेस मुंबईकरांच्या सेवेत; दिव्यांगांसाठी लिफ्टची सुविधा; मुख्यमंत्र्यांकडून लोकार्पण
2 जागतिक पुरस्कार जिंकणाऱ्या मराठमोळ्या शिक्षकाचं राज ठाकरेंनी केलं कौतुक, म्हणाले…
3 पाचच काय, २५ वर्षे गाडा हाकू !
Just Now!
X