News Flash

ठाण्यात दाम्पत्याची आत्महत्या

खोपट परिसरात एका दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. एकनाथ घाग (६४) आणि संगीता घाग (६०) अशी त्यांची नावे असून ते गणपती व्हिला

| May 22, 2014 04:21 am

खोपट परिसरात एका दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. एकनाथ घाग (६४) आणि संगीता घाग (६०) अशी त्यांची नावे असून ते गणपती व्हिला येथे राहत होते. ठाणे ग्रामीण पोलीस दलात वाहन चालक असणाऱ्या घाग यांनी चार वर्षांपूर्वी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. त्यांच्या मुली वारंवार घरी दूरध्वनी करत होत्या. मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांची एक मुलगी घरी आली. बराच वेळ बेल वाजवूनही दरवाजा उघडला नसल्याने खिडकीचे गज काढून त्यांनी आत प्रवेश केला. तेव्हा हे दोघेही मृतावस्थेत आढळून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 4:21 am

Web Title: tahne couple commits suicide
Next Stories
1 भ्रष्ट अधिकाऱ्यांची यादी तयार
2 अप्पर क्रस्टप्रकरणी रहिवासी सरसावले!
3 ठाण्याला बारवीचा जलदिलासा..!
Just Now!
X