22 September 2020

News Flash

टक टक गँगकडून शहीद अशोक कामटेंच्या पत्नीच्या पर्सची चोरी

दहशतवाद्यांचा सामना करताना शहीद झालेले पोलीस अधिकारी अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे यांनी वरळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.

मुंबईवरील २६/११ हल्ल्यात दहशतवाद्यांचा सामना करताना शहीद झालेले पोलीस अधिकारी अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे यांनी वरळी पोलीस स्टेशनमध्ये पर्स चोरीची तक्रार नोंदवली आहे. विनिता कामटे या गाडीतून उतरुन खासगी बँकेमध्ये जात असताना अज्ञात चोरटयांनी गाडीतून त्यांची पर्स चोरली. त्यामध्ये तीन हजार रुपये, दागिने आणि काही पेपर होते.

अशोक कामटे हे मुंबई पोलीस दलात अतिरिक्त पोलीस आयुक्त होते. विनिता कामटे यांनी मार्च महिन्यात पर्स चोरीचा एफआयआर नोंदवला आहे. पण अजूनही कोणालाही अटक झालेली नाही. पोलिसांना ‘टक टक’ गँगवर संशय आहे. ही टोळी वाहनांमधून वस्तू चोरी करण्यामध्ये सक्रीय आहे. पर्सची चोरीची ही घटना घडली त्यावेळी विनिता कामटे यांचा ड्रायव्हर आणि अजून एक जण कारमध्ये होता.

आरोपींनी गाडीच्या दरवाजावर टक टक करुन ड्रायव्हरला खाली पैसे पडल्याचे सांगितले. ड्रायव्हर खाली उतरल्यानंतर ते जबरदस्तीने गाडीत घुसले व पर्स उचलून त्यांनी पळ काढला असे पोलीस स्थानकात नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 2:47 pm

Web Title: tak tak gang steals purse of ashok kamtes wife vinita kamte
Next Stories
1 संवेदनशील प्रकरणांमध्ये हस्तक्षेप नको
2 उपनगरी रेल्वे गाडीची ‘बफर’ला धडक
3 रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक
Just Now!
X