26 February 2020

News Flash

शेतकरी पीक विमा योजनेतील ‘झारीतले शुक्राचार्य’ शोधा-उद्धव ठाकरे

शिवसेनेने आंदोलन केल्यामुळेच शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे

शेतकरी पीक विमा योजनेत जे झारीतले शुक्राचार्य आहेत त्यांना शोधलं गेलं पाहिजे अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. फसव्या पीक विमा कंपन्यांवर कारवाई करा अशीही मागणी यावेळी त्यांनी केली. मुंबईत त्यांची पत्रकार परिषद पार पडली, याच पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. १० लाख शेतकऱ्यांना भरपाई मिळाली मात्र ९० लाख शेतकऱ्यांना मिळाला नाही. जे शेतकरी अपात्र ठरवले गेले त्यांना कोणत्या निकषावर ठरवले गेले हेदेखील आम्ही शोधणार आहोत असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

आम्ही पीक विमा कंपनी बचाव योजना चालवत नाही जी योजना आहे ती शेतकऱ्यांची योजना आहे. सरकार पैसे देत असतं, मधले झारीतले शुक्राचार्य कोण आहेत ते शोधा. परिस्थिती अशी होती की अनेक शेतकऱ्यांना ही योजनाच माहित नव्हती. विमा कंपन्या पैसे देत नसतील तर सरकारने शेतकऱ्यांना पैसे द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली. शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालीच पाहिजे. जर शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत तर शिवसेना पुन्हा आंदोलन करेल असाही इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

First Published on August 23, 2019 2:08 pm

Web Title: take action against fake crop insurance companies demands uddhav thackeray for farmers scj 81
Next Stories
1 ज्येष्ठ लेखिका आशा आपराद यांचे निधन
2 ‘त्या’ वक्तव्यावर सयाजी शिंदेंनी मागितली माफी
3 हे सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतंय : मुख्यमंत्री
Just Now!
X