03 December 2020

News Flash

अनधिकृत बांधकामांचा कायमचा बंदोबस्त करा !

बस्स! आता पुरे झाले (इनफ इज इनफ) अशा शब्दात बेकायदा बांधकामांविरोधात चीड व्यक्त करत यापुढे ठाण्यासह राज्यभरातील अवैध बांधकामांना कायमचा पायबंद घालण्याची कठोर भूमिका

| April 27, 2013 04:36 am

 बस्स! आता पुरे झाले (इनफ इज इनफ) अशा शब्दात बेकायदा बांधकामांविरोधात चीड व्यक्त करत यापुढे ठाण्यासह राज्यभरातील अवैध बांधकामांना कायमचा पायबंद घालण्याची कठोर भूमिका राज्य सरकारने घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. ही मागणी करत असताना ठाण्यातील बेकायदा तसेच धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांविषयी मात्र त्यांनी पुन्हा एकदा सहानुभूती व्यक्त केली आहे.
वागळे इस्टेट, किसननगर, कळवा, खारेगाव, दिवा, मुंब्रा या भागात उभ्या राहिलेल्या अतिक्रमित इमारतींमधून ठाण्यातील ७० टक्के रहिवाशांचे वास्तव्य आहे, असा अंदाज व्यक्त होतो आहे. असे असताना रस्त्यावर आलेल्या हजारो कुटुंबांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर असेल, याचा विचार सरकारने करावा अशी इशारावजा सूचनाही पवार यांनी या पत्रातून केली आहे.   
 बेकायदा बांधकाम करणारे बिल्डर, त्यांना अभय देणारे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या अभद्र साखळीची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी या पत्राद्वारे पवार यांनी केली आहे.
धोकादायक आणि बेकायदा इमारतींवर कारवाई व्हायलाच हवी. परंतु, सर्वप्रथम लोकप्रतिनिधी मग तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याचा बांधकामावर कारवाई केल्यास कर्तव्यकठोरतेचा संदेश सामान्यांमध्ये जाईल, या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार पवार यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 4:36 am

Web Title: take action against unauthorised construction
Next Stories
1 प्राध्यापकांना ५०० कोटींच्या वाटपाचे आदेश, तरीही अरेरावी सुरूच
2 न्यायाधीशांवर चप्पल भिरकावली
3 अनुदानित शाळांमधील साडेतीन हजारांहून अधिक शिक्षकांचा ‘मे’चा पगार लांबणीवर
Just Now!
X