28 November 2020

News Flash

…या बाईवर तात्काळ कारवाई करा, मुंबई पोलिसांच्या सन्मानाचा विषय आहे – संजय राऊत

वाहतूक पोलिसाला भर रस्त्यात मारहाण करणाऱ्या महिलेला अखेर अटक

करोना काळातही जीवावर उदार होऊन कर्तव्य बजाणाऱ्या पोलिसांचा उल्लेख आपण करोना योद्धे म्हणून करतो. मात्र, मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या, एका पोलीस कर्मचाऱ्यास एका महिलेकडून भर रस्त्यात मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आल्याने, याबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान, हा व्हिडिओ पाहून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पोलिसाला मारहाण करणाऱ्या या महिलेवर तात्काळ कारवाई करायलयाच हवी अशी मागणी केली. तर, दुसरीकडे या महिलेस अटक करण्यात आली असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

”या बाईवर तात्काळ कारवाई करायलाच हवी. मुंबई पोलिसांच्या सन्मानाचा विषय आहे..Take Action..”अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. शिवाय, सोबत घटनेचा व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केला आहे.

मुंबईतील काळबादेवी परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. आरोपी महिला पोलिसाचा शर्ट पकडून त्याला मारहाण करत होती. विशेष म्हणजे यावेळी संबंधित पोलिसासोबत त्याचा सहकारी देखील उपस्थित होता. तू अपशब्द कुणाबद्दल वापरतोस? असं विचारत आरोपी महिला त्या पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करताना व्हिडिओत दिसत आहे.

प्राप्त माहितीनुसार, काळबादेवी परिसरात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने या महिलेवर तिने वाहतूक नियम मोडल्याबद्दल कारवाई केली होती. यामुळे संतापलेल्या महिलेने पोलिसावर हात उगारला. तर, तिने आरोप केला आहे की, पोलीस कर्मचाऱ्याने तिच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली आहे.

या प्रकरणी आरोपी महिला आणि तिच्यासोबतच्या आणखी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय, या दोघांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 4:34 pm

Web Title: take immediate action against this woman it is a matter of honor for mumbai police sanjay raut msr 87
Next Stories
1 मुंबईकरानो, मास्क घालूनच घराबाहेर पडा, नाहीतर करावी लागेल रस्त्यावर साफसफाई
2 शिक्षकाच्या प्रश्नाला उत्तर न दिल्यानं आईनं मुलीला पेन्सिलनं भोसकलं; मुंबईतील हादरवून टाकणारी घटना
3 मुखपट्टी नसल्यामुळे गिरीश महाजन यांना दंड
Just Now!
X