News Flash

जगभर फिरताय, मंत्रिमंडळाचा एखादा दौरा फुकुशिमालाही न्या!

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे शरसंधान केले असून ‘अन्य देशांमध्ये फिरायला जाता, तर

| May 17, 2015 04:30 am

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे शरसंधान केले असून ‘अन्य देशांमध्ये फिरायला जाता, तर मंत्रिमंडळाचा एखादा दौरा फुकुशिमा आणि चेर्नोबिललाही नेण्यात यावा,’ असा सणसणीत टोला त्यांनी लगावला आहे. केंद्र सरकारच्या प्रस्तावित भूमी अधिग्रहण कायद्याला विरोधाची भूमिका कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई मराठी पत्रकार संघात पुरस्कार वितरण समारंभात बोलताना ठाकरे यांनी जैतापूर आणि भूमी अधिग्रहण कायद्यावरून ठाकरे यांनी भाजपला खडे बोल सुनावले. जैतापूर प्रकल्पाला काही माझ्यासाठी विरोध करीत नाही. जरा फुकुशिमा व चेर्नोबिलला जाऊन तेथील अवस्था पाहिली की परिस्थिती लक्षात येईल. कोकणातील जनतेचे हित पाहून या प्रकल्पाला विरोध करीत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. अनेक देशांमध्ये अणुऊर्जा प्रकल्प बंद होत असताना आपल्यालाच तो का हवा आहे, असा सवाल ठाकरे यांनी केला.
विनोबा भावे यांच्या ‘भूदान’ चळवळीचा संदर्भ देऊन आता शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पांसाठी लाटण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका ठाकरे यांनी केली. प्रकल्पांमध्ये भूमिपुत्रांना रोजगाराची संधी दिली पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. अनेक गोष्टींची वाट लागली आहे, पण वाट दाखविणारे कोणी नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2015 4:30 am

Web Title: take ministers deligation to fukushima uddhav thackeray
Next Stories
1 मुंबईत १९ मे रोजी रिअल इस्टेट कॉनक्लेव्ह
2 मुंबईच्या टोलनाक्यावरील वाहनांची पुन्हा मोजणी
3 लेखकांच्या हक्कासाठी ‘मानाचि’ चळवळ
Just Now!
X