News Flash

अवैध धंद्यांवर कठोरकारवाई करा!

पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील कर्मचाऱ्यांना सूचना देतानाची एक ध्वनिफीत समाजमाध्यमातून प्रसारित झाली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

मुंबई : पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंदे सुरू राहिल्यास संबंधित पोलीस ठाण्यातील रात्रपाळीचे पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी यांना जबाबदार धरून निलंबन अथवा विभागीय चौकशीची कारवाई केली जाईल. तसेच परिमंडळाच्या हद्दीत अवैध धंदे आढळून आल्यास पोलीस उपायुक्त आणि अपर पोलीस आयुक्त यांना जबाबदार धरले जाईल, अशा स्पष्ट सूचना पोलीस सह आयुक्त विश्वाास नांगरे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील कर्मचाऱ्यांना सूचना देतानाची एक ध्वनिफीत समाजमाध्यमातून प्रसारित झाली आहे. या ध्वनिफीतीत नांगरे पाटील अधिकाऱ्यांना अवैध धंद्यांवरती कडक कारवाई करून ते बंद करण्याचे आदेश देत आहेत. यामुळे मागील काही दिवसांपासून विविध प्रकरणांमुळे चर्चेत असलेल्या पोलिसांना पुन्हा जोमाने कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

एखाद्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत उपहारगृह, मद्यालय, पब, कुंटणखाने, हुक्का पार्लर, मसाज सेंटर, दारू, जुगार हे अवैधरित्या सुरू राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागले, असा इशारा नांगरे पाटील यांनी दिला आहे. त्याचबरोबर अवैध धंदे शंभर टक्के बंद करून त्यामध्ये गुंतलेल्या आणि अमली पदार्थांच्या तस्करीत सामाविष्ट आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

तसेच रात्रीची गस्त सक्षमपणे झाली पाहिजे, अशी सूचना नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी दिल्याचे नांगरे पाटील अधिकाऱ्यांना सांगत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 2:01 am

Web Title: take stern action against illegal trades akp 94
Next Stories
1 भंडारा दुर्घटनेनंतरही रुग्णालयात अग्निसुरक्षा यंत्रणेचा अभाव
2 चौकशी अहवाल १५ दिवसांत
3 राकेश वाधवान,निकिता त्रेहानविरोधात गुन्हा
Just Now!
X