मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोली येथे एका तेलाच्या टँकरला लागलेल्या आगीत चालकाचा मृत्यू झाला. आग इतकी भयंकर होती की चालक जागीच जळून खाक झाला. खोपोली येथे आडोशी गावाजवळ सोमवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली. टँकरच्या केबिनमध्ये लागलेली आग क्षणार्धात पसरली आणि संपूर्ण टँकर जळला. आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती कळू शकलेली नाही.