मुंबई : राज्यात हळूहळू रुळावर येणारे उद्योगविश्व करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बाधित होऊ नये म्हणून उपाययोजना सुचविण्याकरिता डॉक्टरांच्या कृतिदलाच्या धर्तीवर उद्योगमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली उद्योजकांचाही कृतिदल स्थापन करण्यात आले आहे.

‘भारत फोर्ज’चे बाबा कल्याणी, ‘कोटक महिंद्र’चे उदय कोटक, ‘बजाज’चे संजीव बजाज, ‘ब्ल्यू स्टार’चे बी. त्यागराजन, ‘फोब्र्ज मार्शल’चे डॉ. नौशाद फोब्र्ज, ‘हिंदुजा ग्रुप’चे अशोक हिंदुजा, ‘जेएसडब्ल्यू स्टील’चे सज्जन जिंदाल, ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो’चे एस. एन. सुब्रह्मण्यम, ‘महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र’चे डॉ. अनिश शहा, ‘पिरामल ग्रुप’चे अजय पिरामल, ‘टाटा सन्स’चे बनमाळी अगरवाल, ‘आरपीजी इंडस्ट्रीज’चे हर्ष गोयंका, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चे निखिल मेसवानी, ‘हिरानंदानी ग्रुप’चे निरंजन हिरानंदानी, ‘के . रहेजा ग्रुप’चे नील रहेजा, ‘डब्ल्यूएनएसचे ग्लोबल सव्‍‌र्हिसेस’चे के शव मुरूगेश, ‘फिक्की’च्या (महाराष्ट्र) अध्यक्ष आणि ‘कायनेटीक ग्रुप’च्या सुलज्जा फिरोदिया-मोटवानी, ‘एडलवाईज ग्रुप’चे राजेश शहा, ‘ऑल कार्गो लॉजिस्टीक्स’चे शशी किरण शेट्टी, ‘वोक्कहार्ट’चे डॉ. हबील खोराकीवाला, ‘सीआयआय’चे अध्यक्ष आणि ‘पॉझिटिव्ही मीटरिंग पंप’चे सुधीर मुतालिक या अग्रगण्य उद्योजकांचा या दलात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय सीआयआय, फिक्की, नासकॉम या संस्थाचे अध्यक्ष यात सहभागी होतील. राज्याचे मुख्य सचिव, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खरगे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, वैद्यकीय शिक्षणचे सचिव, उद्योग विभागाचे विकास आयुक्त यांचाही या ३० जणांच्या कृतिदलात समावेश असेल. १२ जुलैला मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील  बैठकीत कृतिदलाची संकल्पना पुढे आली होती.

कृतिदलावरील जबाबदारी

* करोनामुळे उद्भवलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीला प्रतिसाद

* उपाययोजना करणे

* मदतीसाठी समन्वय, कामगारांकरिता लशींची उपलब्धता, करोना केंद्रांची उभारणी, चाचणीची सुविधा, पाणवायू, अन्नपुरवठा

* औद्योगिक क्षेत्रांमध्ये आरोग्यविषयक नियमांचे पालन