News Flash

पालिकेच्या शिक्षकांना करोना संशयितांच्या पडताळणीचे काम

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढत आहे

(संग्रहित छायाचित्र)

करोनाच्या प्रादुर्भावाची शंका असल्यामुळे घरी अलगीकरणात ठेवण्यात आलेल्या संशयित किंवा रुग्णांची पडताळणी करण्याचे काम मुंबई महापालिकेने शिक्षकांना दिले आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढत आहे. दाटीवाटीच्या भागांमध्ये रुग्ण मिळाल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यातच घरी अलगीकरणात राहण्याचे आदेश देण्यात आलेले अनेक संशयित आणि रुग्ण बिनदिक्कत घराबाहेर फिरत असल्याचे आढळून आले आहे. संशयित नागरिक घरातच राहात आहेत ना याची पडताळणी करण्यासाठी पालिकेने कर्मचाऱ्यांचे गट तयार केले आहेत. त्यामध्ये पालिका शाळांतील शिक्षकांनाही पडताळीचे काम देण्यात आले आहे. पालिकेच्या उत्तर विभागातील शिक्षकांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. काम नाकारणाऱ्या शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

दरम्यान या आदेशावर शिक्षक आणि संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्य़ांच्या हद्दी बंद करण्यापूर्वी काही शिक्षक गावाला गेले आहेत. ते या आदेशानुसार ताबडतोब काम कसे सुरू करणार? अनेकांना परत येण्यासही मार्ग नाही. पालिकेकडे मोठय़ा संख्येने कर्मचारी असताना शिक्षकांना का काम दिले जाते? असे आक्षेप शिक्षकांनी घेतले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 12:40 am

Web Title: task of verification of corona suspects to municipal teachers abn 97
Next Stories
1 चाचण्यांमध्ये मुंबईची दिल्लीवर आघाडी
2 वीज ग्रिड सुरक्षेसाठी सज्जता
3 पुढील काही काळ राज्यात उत्सव नकोत
Just Now!
X