|| संदीप आचार्य

डॉक्टरांसाठी १५ मजली निवासी इमारत

Tiger from sanctuary missing after collar falls off Nagpur
‘कॉलर’ गळून पडल्याने अभयारण्यातील वाघीण ‘बेपत्ता’
Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral
High Court restrains demolition of loom department in Mafatlal
मफतलालमधील यंत्रमाग विभाग पाडण्यास उच्च न्यायालयाचा मज्जाव
Two Drunk Policemen, Vandalize Hotel, Assault Owner, hudkeshwar police station, crime, marathi news,
मद्यधुंद पोलिसांची भोजनालयात तोडफोड, चित्रफीत प्रसारित झाल्याने खळबळ

मुंबई : देशभरातील कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कर्करोगावरील उपचारांत देशपातळीवर एकसमानता निर्माण करून देशात १८० ठिकाणी ‘नॅशनल कॅन्सर ग्रीड’ निर्माण करण्याचे काम टाटा कॅन्सर हॉस्पिटलने केले आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील परळ येथे येणाऱ्या वाढत्या कर्करुग्णांची संख्या लक्षात घेऊन हाफकिन संस्थेत पाच एकर जागेवर सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे.

हॉस्पिटलबरोबरच डॉक्टर व परिचारिकांच्या राहण्यासाठी १५ मजली निवासी इमारत बांधण्यात आली असून रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी धर्मशाळाही बांधण्यात येणार आहे.

परळच्या हाफकिन संस्थेत नवीन टाटा कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या असून ५५० खाटा व २० शस्त्रक्रियागृहे असलेल्या या रुग्णालयाचे बांधकाम  येत्या पाच महिन्यांत सुरू करण्याचा मानस असल्याचे टाटा कॅन्सर रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी सांगितले.

हाफकिनमधील रुग्णालयाच्या प्रकल्पासाठी सुमारे ४५० कोटी रुपये खर्च येणार असून धर्मशाळा व डॉक्टर आणि परिचारिकांच्या निवासस्थानासाठी २३० कोटी असे ६८० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यात धर्मशाळेचे बांधकाम हे सीएसआर वा दानशूर व्यक्तींकडून मिळणाऱ्या निधीतून करण्यात येणार असून यासाठी तीन-चार लोक पुढे आल्याचेही डॉ. श्रीखंडे यांनी सांगितले. धर्मशाळेत एकूण २०८ खोल्या असतील. यासाठी ६८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हाफकिनमधील मोठे वृक्ष न तोडता रुग्णालयाचे बांधकाम करण्यात येणार असल्याचेही डॉ. श्रीखंडे यांनी नमूद केले.

देशभरात दरवर्षी १० लाखांहून अधिक लोकांना क र्करोग होतो.  हृदयविकारानंतर कर्करोग हाच देशातील सर्वात मोठा आजार आहे. नव्याने कर्करोग झालेल्या रुग्णांमध्ये पन्नास टक्के प्रमाण हे स्त्रियांचे आहे. यात स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण हे जवळपास १४ टक्के एवढे आहे. याशिवाय १० टक्के रुग्णांना मेंदू व मानेचा कर्करोग असून वाढत्या कर्करुग्णांवर परळच्या विद्यमान टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार करणे हे एक आव्हान होते. येथे वर्षांकाठी जवळपास ८५ हजार नवीन रुग्ण येत असून साडेपाच लाख जुने रुग्ण नियमित तपासणीसाठी येत असतात. परिणामी हाफकिनमध्ये नवीन कॅन्सर हॉस्पिटल आवश्यक होते. देशभरातून मुंबईत उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नियोजित रुग्णालयाचा प्रकल्प हा वेळेत म्हणजे २०२२ पर्यंत पूर्ण करण्यावर आमचा भर राहील, असे टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजन बडवे यांनी सांगितले.

या नव्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये एकूण सहा प्रकारच्या कर्करोगांवर उपचार करण्यात येणार असून यात जठर, हाडे, मेंदू, कान-नाक  व घसा, मूत्राशय तसेच थोरॅसिक कर्करोगावर उपचार करण्यात येतील. सध्या असलेल्या परळच्या टाटा कॅन्सर रुग्णालयात पुढील काळात प्रामुख्याने  स्तनाच्या व अन्य कर्करोगावर उपचार केले जातील.