07 March 2021

News Flash

परळच्या टाटा हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरने इंजेक्शनद्वारे केली आत्महत्या

परेलच्या टाटा मेमोरियल रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने इंजेक्शनद्वारे आत्महत्या केली. रुपाली काळकुंद्रे (३१) असे मृत महिला डॉक्टरचे नाव आहे.

परळच्या टाटा मेमोरियल रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने इंजेक्शनद्वारे आत्महत्या केली. रुपाली काळकुंद्रे (३१) असे मृत महिला डॉक्टरचे नाव आहे. अॅनेस्थेशिया तज्ञ असलेल्या रुपाली यांना कुठल्या औषधाचा शरीरावर काय परिणाम होऊ शकतो याची पूर्ण माहिती असल्याने त्यांनी स्वत:च इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली.

हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांची तिथेच निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी रुपाली त्यांच्या खोलीत बेशुद्धाअवस्थेत सापडल्या असे टाटा मेमोरियल रुग्णालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. रुपाली काळकुंद्रे मूळच्या कोल्हापूरच्या आहेत. त्या नैराश्याने ग्रस्त होत्या.

मागच्या काहीवर्षांपासून त्यांच्यावर नैराश्याच्या आजारावर उपचार सुरु होते. त्यांचे पतीही डॉक्टर आहेत. परळचे टाटा रुग्णालय कॅन्सरवर उपचारासाठी प्रसिद्ध आहे. कॅन्सरच्या आधुनिक उपचारपद्धती या हॉस्पिटलमध्ये असल्याने देशभरातून मोठया संख्येने रुग्ण टाटा रुग्णालयात येतात. शनिवारी संध्याकाळी ४.३० च्या सुमारास आम्हाला या आत्महत्येबद्दल कळले. पोलिसांनी सध्या तरी अपघाती मृत्यू अशी नोंद केली आहे भोईवाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी ही माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2018 4:48 pm

Web Title: tata hospital doctor commits suicide
टॅग : Doctor
Next Stories
1 आंदोलक शेतकऱ्यांना तुरुंगात टाका, जामीनही देऊ नका-रविना टंडन
2 दादा कोंडकेंची जशी स्टाईल होती, तशीच माझी स्टाईल: उदयनराजे भोसले
3 कृष्णकुंजवर राज ठाकरे-विनोद तावडे भेट, राजकीय चर्चांना उधाण
Just Now!
X