कविता आणि गाणे सारखेच असले तरी त्यांच्या रचनांमागील इतिहास, तंत्र आणि संदर्भ या तीन मुद्दय़ांवरून हे दोन साहित्य प्रकार वेगळे ठरतात.. कविता आणि गाणे सारखेच असते, या विधानावर गीतकार आणि कवी यांच्यात दुमत असले तरी या दोन साहित्यप्रकारांमध्ये वरील तीन मुद्दय़ांच्या संदर्भात फरक आहे, यावर ‘टाटा लिटरेचर लाइव्ह’ या साहित्य महोत्सवादरम्यान आयोजित परिसंवादात वक्त्यांनी एकमत व्यक्त केले. ‘गीतकारांना कवी म्हणायचे का?’ असा या परिसंवादाचा विषय होता.

यात सहभागी झालेल्या गीतकार प्रसुन जोशी, ब्रिटिश कादंबरीकार मार्टिन एमिस, कवी सिमोन आर्मिटेज यांना चित्रपटनिर्माती पारोमिता वोहरा यांनी बोलते केले. कविता रचताना मनातील विचार, भावना शब्दांमध्ये व्यक्त होत असतात. मात्र हे स्वातंत्र्य चित्रपट गीतांमध्ये मिळत नाही. याची रचना करताना संगीत आणि वेळेची चौकट सांभाळावी लागते. त्यामुळे कवींच्या भावना, मनाची परिस्थिती गीतात उतरत नाही. इंग्लंडमध्ये रचल्या जाणाऱ्या गीतांमध्ये शब्दांच्या अर्थापेक्षा संगीतावर भर दिला जातो. कविता आणि गीतांचा बाज वेगळा असल्यामुळे त्यांची तुलना होऊ शकत नाही, अशा शब्दांत आपली भूमिका मांडताना आर्मिटेज यांनी वेगवेगळी उदाहरणे दिली. अमिस यांनी मात्र कविता हा साहित्यातील उच्च दर्जाचा प्रकार असल्याचे ठाम मत मांडले.

प्रसुन जोशी यांनी वेगळी भूमिका मांडत- ‘भारताला मोठा सांस्कृतिक इतिहास असून संतांना स्फुरलेल्या कविता चित्रपट गीतांच्या माध्यमातून अजरामर झाल्या. ग्रामीण भागात जात्यावर दळतानाच्या कविता, मैत्रिणींसोबत कौटुंबिक गप्पा रंगताना सुचलेल्या कविता अशा अनेक सामाजिक जाणिवा आणि अनुभवातून आलेल्या कविता चित्रपटांच्या माध्यमातून देशभरात ऐकल्या जात आहेत. कैफी आझमी, साहिल लुधियानवी, गुलजार यांच्या कविता, मनाचा ठेका चुकविणाऱ्या कवी गालिब यांच्या गझल चित्रपटगीताच्या माध्यमातून लाखो चाहत्यांपर्यंत पोहोचल्या आहेत,’ असे सांगितले. संगीतांच्या ठेक्यावर शब्दाची मांडणी करताना वेगळी कल्पकता लागते. मात्र, त्या वेळी मूळ कवितेत काही बदल करावे लागत असले तरी त्याचा गाभा बदलणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कढीचे ‘सार’

आपल्याकडची कढी, रस्सा किंवा सार याची नावे वेगळी असली तरी जगभरात कुठल्याही प्रकारच्या घट्ट रश्शाला ‘करी’च म्हटले जाते.  कढीचे हे ‘सार’ ‘चेसिंग दि करी’ या देशी पाककृतींचा परदेशातील ठावठिकाणा शोधणाऱ्या परिसंवादाच्या निमित्ताने मांडण्यात आले. इंग्रजीत जिला ‘करी’ म्हणतात ती मूळची भारतीय की ब्रिटिश हे गेली अनेक वर्षे ‘कढी’चा अभ्यास करणाऱ्या कोलीन टायलर सेन यांनाही सांगता आले नाही. यात सेन यांच्यासह विविध प्रकारच्या खाद्यपदार्थावर रंजकपणे लिहिणारे पत्रकार वीर संघवी वा वाइनविषयक तज्ज्ञ अ‍ॅन्टोनी लेविस सहभागी झाले होते.

 

‘टाटा लिटरेचर लाइव्ह’मध्ये २० नोव्हेंबर रोजी

एक्सप्रिमेण्टल थिएटर

* स.१०.३० – परिसंवाद – ‘बरिड अलाइव्ह – इन्हेस्टिगेटीव्ह जर्ननिझम स्टोरीज दॅट नेव्हर सॉ लाइट अ डे’. सहभाग – जोसी जोसेफ, सिद्धार्थ भाटिया, शेखर गुप्ता.

* दुपारी १२ – वादविवाद – ‘दि ग्रेटनेस ऑफ शेक्सपिअर इज हिज लॅँग्वेज.’ सहभाग – अलेक पदमसी, सुहेल सेठ, कालरेस गमेरो, सिमॉन चो.

* दुपारी २ – परिसंवाद – ‘शुड इंडिया गेट रिड ऑफ सरनेम्स?’ सहभाग – जावेद आनंद, नरेंद्र जाधव, निवेदिता मेनन.

* दुपारी ३.३० – व्याख्यान – ‘फिफ्टी शेड्स ऑफ एथिजम’. वक्ते जॉन ग्रे.

लिटिल थिएटर

* सकाळी १०.३० – परिसंवाद – ‘लव्ह, डेथ, कास्ट – शुड सिरिअस टॉपिक्स स्टे अवे आऊट ऑफ चिल्ड्रेन्स लिटरेचर’ सहभाग – देवप्रिया लाहिरी, नीना शबानी.

* दुपारी १२ – कवितावाचन. सहभाग – अँजेलिका फ्रेइटास, अश्विनी कुमार, रेबेका पेरी.

* दुपारी २ – व्याख्यान – ‘दि चेंजिग फेस ऑफ वॉर इन ट्वेन्टीएथ सेन्चुरी’. वक्ते – जॉन हॉर्न

गोदरेज थिएटर

* सकाळी १०.३० – परिसंवाद- ‘जय जवान- इंडियन सोल्जर्स इन दि ग्रेट वॉर्स’. सहभाग – जॉन हॉर्न्स, श्रीनाथ राघवन, उमी सिन्हा.

* दुपारी १२ – परिसंवाद – ‘रीडिंग ऑफ दि पिच -क्रिकेट रायटिंग अ‍ॅण्ड हाऊ इट्स नॉट जस्ट अबाऊट दि गेम’. सहभाग – अंजली दोसी, अयाझ मेनन, रोहित ब्रिजनाथ.

* दुपारी ३.३० – चर्चा – बसलिंग बबल्स – व्हाय इज दि लिबरल सो आऊट ऑफ टच विथ दि रिअल वर्ल्ड. सहभाग – मार्टिन अमिस, निवेदिता मेनन, श्रीनिवासन जैन.

पृथ्वी थिएटर

* सकाळी १०.३० – जाहिरात क्षेत्रातील ५० वर्षे यावर अंबी परमेश्वरन यांचे व्याख्यान

* दुपारी १२ – चर्चा – ‘नरसिंह राव – दि फॉरगॉटन हिरो’. सहभाग – पी. चिदम्बरम, संजय बारू.

* दुपारी २ – चर्चा – ‘चेअरमन माँ- वुमन पॉलिटिशियन्स इन साऊथ एशिया’. सहभाग- मार्गारेट अल्वा, मा थिडा, शबाना आझमी.