28 September 2020

News Flash

Coronavirus : आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना विनामूल्य प्रशिक्षण

क्षमता वाढविण्यासाठी टाटा ट्रस्टचा उपक्रम

संग्रहित छायाचित्र

करोना उद्रेकाच्या काळात डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने करोना रुग्णांच्या व्यवस्थापनाचे ऑनलाइन प्रशिक्षण टाटा ट्रस्टच्यावतीने आयोजित केले जात आहे. यात आत्तापर्यंत राज्यातील डॉक्टरांसह २६० आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले असून हे विनामूल्य उपलब्ध आहे.

करोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने त्या तुलनेत डॉक्टर, परिचारिकासह आरोग्य कर्मचारी यांचे मनुष्यबळ कमी आहे. विशेषत: अतिदक्षता विभागात अधिकतर आवश्यकता असल्याने डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना याचे प्रशिक्षण दिल्यास मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकेल. यासाठी टाटा ट्रस्टने एप्रिलपासून ऑनलाइन प्रशिक्षण सुरू केले. ख्रिश्चन वैदकीय महाविद्यालय(वेल्लोर) आणि केअर इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्ससेस(हैद्राबाद) या संस्थांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जाते. संशयित, करोनाबाधित रुग्णाचे व्यवस्थापन, अतिदक्षता विभागातील उपचार पद्धती, रुग्णालयीन सुरक्षात्मक उपाययोजना, करोना चाचण्या, मृतदेहाचे व्यवस्थापन इत्यादी विषय यामध्ये समाविष्ट आहेत.

राज्यात चार सरकारी आणि १९ खासगी अशा २३ रुग्णालयातील २६० आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना या प्रशिक्षणाची मदत झाली. यात ५० टक्के डॉक्टर होते. सांगली आणि बुलढाणामधील सरकारी रुग्णालयातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात आले होते. तर मुंबईत अनेक खासगी रुग्णालये सहभागी झाली होती, अशी माहिती टाटा ट्रस्टचे संसर्ग आजारांचे सल्लागार डॉ. विक्रम सहाणे यांनी सांगितले.

नियमावलीबाबतही माहिती

प्रशिक्षणासह करोना उपचारांच्या बदलत्या नियमावलीबाबतही माहिती सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थीला वेळोवेळी दिली जाते. त्यामुळे प्रशिक्षण पूर्ण झाले तरी मार्गदर्शनासाठी तज्ज्ञ उपलब्ध असतात, अशी माहिती संस्थेने दिली. विनामूल्य असलेल्या या प्रशिक्षणाचा उपयोग अधिकाधिक रुग्णालये आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेने केले आहे. यासाठी विक्रम सहाणे- ८४३३९९८७७६ किंवा vsahane@tatatrusts.org यावर संपर्क साधावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 11:48 am

Web Title: tata trust organizing spacial training for health working including doctors coronavirus pandemic jud 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 गणपती बाप्पा मोरया…कोकणात जाणाऱ्यांसाठी मनसेची विशेष बससेवा
2 राज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक
3 कंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन
Just Now!
X