06 July 2020

News Flash

उत्तरपत्रिकांचे गठ्ठे महाविद्यालयांत पडून

उत्तरपत्रिका तपासण्यासाठी राज्य मंडळाकडून महाविद्यालयांकडे पाठविण्यात आल्या आहेत. मात्र शिक्षकांनी पेपर तपासणीच्या कामावर बहिष्काराची भूमिका घेतल्यामुळे महाविद्यालयांमध्ये उत्तर पत्रिकांचे गठ्ठे प्राचार्याच्या दालनात पडून आहेत.

| February 25, 2014 02:23 am

उत्तरपत्रिका तपासण्यासाठी राज्य मंडळाकडून महाविद्यालयांकडे पाठविण्यात आल्या आहेत. मात्र शिक्षकांनी पेपर तपासणीच्या कामावर बहिष्काराची भूमिका घेतल्यामुळे महाविद्यालयांमध्ये उत्तर पत्रिकांचे गठ्ठे प्राचार्याच्या दालनात पडून आहेत.
सोमवारी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा आणि शिक्षण सचिवांची भेट घेतली. जोपर्यंत मान्य झालेल्या मागण्यांचा अध्यादेश जारी होत नाही तोपर्यंत बहिष्कार कायम ठेवण्यात येणार असल्याचे आम्ही त्यांना स्पष्ट केले, अशी माहिती महासंघाचे सरचिटणीस अनिल देशमुख यांनी दिली. सोमवारी झालेल्या हिंदी विषयाच्या नियामकांच्या बठकीवरही शिक्षकांनी बहिष्कार टाकला. या बैठकीत केवळ १४ शिक्षकच उपस्थित होते, असेही त्यांनी सांगितले. अध्यादेश जारी झाल्यावर शिक्षक अतिरिक्त वेळ काम करून वेळेवर निकाल लावण्यास मंडळाला पूर्ण सहकार्य करतील असेही देशमुख म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीने उत्तर पत्रिका तपासणीच्या कामकाजास सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या संघटनेचे २२५०० शिक्षक मंडळाला सहकार्य करणार असून वेळेत निकाल लागावा यासाठी आम्ही मदत करू, असे समितीचे राज्य अध्यक्ष टी. एम. नाईक यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2014 2:23 am

Web Title: teachers refuse to check hsc answer papers
टॅग Teachers
Next Stories
1 उल्हासनगर महापालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण
2 ‘राजयोग’ मध्ये राहणाऱ्या एकाही आमदाराचे मुंबईत घर नाही!
3 गारगाई नदीवरील पूल कोसळल्याने अनेक गावांचा संपर्क खंडित
Just Now!
X