|| उमाकांत देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हजारो भाडेकरूंची परवड

मुंबई : भाडेकरारांची ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या वेबसाइट व सव्‍‌र्हरमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने राज्यभरातील हजारो भाडेकरूंची परवड होत आहे. दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात गेल्यावर मात्र नोंदणी होत असल्याचा अनुभव येत असून एजंटांकडून ग्राहकांची लुबाडणूक होत आहे. याबाबतच्या तक्रारींची महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी मुद्रांक महानिरीक्षक ओमप्रकाश देशमुख यांना सोमवारी दिले.

सव्‍‌र्हर, यूआरएल व वेबसाइटच्या तांत्रिक अडचणी वेगवेगळ्या पातळ्यांवर येत असून त्यामागच्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे. भाडेकरूंना ऑनलाइन दस्तनोंदणी करण्याची सुविधा तातडीने पूर्ववत केली जाईल, असे महानिरीक्षक देशमुख यांनी ‘ लोकसत्ता ‘ ला सांगितले.

राज्यभरात दररोज हजारो दस्तनोंदणीचे व्यवहार केले जातात. भाडेपट्टय़ाने (लीव्ह अ‍ॅण्ड लायसेन्स) जागा घेणाऱ्या भाडेकरूंना मुद्रांक कार्यालयात जाऊन वेळ खर्च करायला लागू नये आणि एजंट किंवा इतरांना जादा पैसे मोजावे लागू नयेत, यासाठी गेली काही वर्षे ऑनलाइन दस्तनोंदणीची सुविधा सरकारने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे घरच्या घरी बसून सुलभपणे ही नोंदणी करता येत होती व हजारो व्यवहार ऑनलाइन पद्धतीने नोंदले जात आहेत. मात्र गेल्या एक-दीड महिन्यांपासून सर्वसामान्य लोकांना दस्तनोंदणीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधेमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड निर्माण होत आहेत. त्यामुळे निबंधकांच्या कार्यालयात जाऊन दस्तनोंदणी करावयास लागत असून त्यासाठी एजंट किंवा इतरांना जादा रक्कम मोजण्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे यासंदर्भात महसूलमंत्री थोरात यांच्याकडेही नागरिकांकडून काही तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे त्यांनी महानिरीक्षकांना तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या असून त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली. तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात येत असून यंत्रणेतील त्रुटी लवकरात लवकर दूर केल्या जातील. ऑनलाइन भाडेकरार नोंदणीची सुविधा लोकप्रिय आहे. ती पूर्ववत केली जाईल, असे देशमुख यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Technical defects in online documentation akp
First published on: 28-01-2020 at 00:36 IST