21 September 2020

News Flash

तंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी या विषयांचे पदविका अभ्यासक्रम

संग्रहित छायाचित्र

तंत्रशिक्षण विषयांच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी (पॉलिटेक्निक) यंदा जवळपास दीड लाख जागा उपलब्ध असून प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार आहे.

दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाच्या पदविका अभ्यासक्रमांचाही पर्याय उपलब्ध होत असून या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून म्हणजे १० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ती २५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी या विषयांचे पदविका अभ्यासक्रम आहेत. प्रवेश अर्ज भरणे आणि कागदपत्रांची छाननी ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन करता येईल. अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ३३६ सुविधा केंद्र तर बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी २४२ सुविधा केंद्र सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. सुविधा केंद्रांची यादी, अर्जाची आणि कागदपत्रांची ऑनलाइन छाननी याबाबतची माहिती, कागदपत्रे आदी माहिती http://www.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर पाहता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 12:47 am

Web Title: technical education diploma admission process from monday abn 97
Next Stories
1 प्रथम वर्ष पदवीच्या ऑनलाइन प्रवेश अर्जासाठी भरमसाट शुल्कवसुली
2 मुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती
3 यूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद
Just Now!
X