News Flash

तेलगी गैरव्यवहारातील गोटेंना भाजपची उमेदवारी

भाजपने १७२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून शिवसेना व अन्य पक्षांमधून आलेल्या ‘आयाराम’ नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

| September 27, 2014 05:50 am

भाजपने १७२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून शिवसेना व अन्य पक्षांमधून आलेल्या ‘आयाराम’ नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तेलगी गैरव्यवहारप्रकरणी अटक झालेले आमदार अनिल गोटे यांना धुळ्यातून उमेदवारी देण्यात आली असून राज्यमंत्री संजय सावकारे यांना उमेदवारी मिळाली आहे. काँग्रेसचे नेते डॉ. सुनील देशमुख यांना अमरावतीतून उमेदवारी देण्यात आली आहे.  सिन्नर येथील काँग्रेस आमदार माणिकराव कोकाटे आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना उमेदवारी मिळाली आहे. विदर्भातील करंजा येथील शिवसेनेचे नेते डॉ. राजेंद्र पटणी आणि मोहोळचे संजय क्षीरसागर भाजपकडून निवडणूक िरगणात उतरले आहेत. कुल्र्यामध्ये विजय कांबळे तर चिंचवडमधून लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी मिळाली आहे. डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप होऊनही त्यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे.
मंदा म्हात्रे यांना बेलापूरमधून तर मनसेचे आमदार आमदार राम कदम यांना घाटकोपर (प.) मधून उमेदवारी मिळाली आहे.
बोरीवलीतून विरोधी पक्षनेते विनोद तावडे, दहिसर मनिषा चौधरी, मागाठणे हेमेंद्र मेहता, मुलुंडमध्ये सरदार तारासिंह, जोगेश्वरी (पूर्व) उज्ज्वला मोडक, दिंडोशी मोहित कंभोज, कांदिवली(पूर्व) अतुल भातखळकर, चारकोपमध्ये आमदार योगेश सागर, मालाड(प.)मध्ये डॉ. राम बारोट, गोरेगावमध्ये विद्या ठाकूर, अंधेरी (प.) अमित साटम, अंधेरी (पूर्व) सुनील यादव, विलेपार्लेतून अ‍ॅड. पराग अळवणी, चांदिवलीतून सीताराम तिवारी, घाटकोपर (पूर्व) मधून आमदार प्रकाश मेहता, अणुशक्तीनगरमध्ये संदीप असोलकर, कुल्र्यातून विजय कांबळे, कालिनातून अमरजीत सिंग, वांद्रे(पूर्व) महेश पारकर, वांद्रे (प.) मधून अ‍ॅड. आशिष शेलार, धारावीतून दिव्या ढोले, शीव-कोळीवाडामधून कॅप्टन तमिळ सेलवन, माहीममधून विलास आंबेकर, वरळीतून सुनील राणे, शिवडीतून शलाका साळवी, भायखळ्यातून मधू चव्हाण, मलबारहिलमधून आमदार मंगलप्रभात लोढा, मुंबादेवीतून अतुल शहा, कुलाबा येथे अ‍ॅड. राज पुरोहित यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 5:50 am

Web Title: telgi stamp scam conspiror anil gote gets bjp ticket
Next Stories
1 ठाण्यात शिवसेनेमध्ये नाराजी
2 फाटाफुटीला ऊत
3 एका घराच्या किमतीत दोन घरे!
Just Now!
X