29 September 2020

News Flash

मुंबईच्या तापमानात वाढ

उष्णेतच्या लाटा व त्यानंतर अवकाळी पाऊस असे चक्र सुरू झाले आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

वेधशाळेच्या अंदाजाप्रमाणे मुंबईचे तापमान शुक्रवारी वाढले. सांताक्रूझ येथे ३६.८ अंश से. तर कुलाबा येथे ३३ अंश से. कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान विदर्भापासून गोव्याच्या दक्षिणेपर्यंतच्या पट्ट्यात ढगाळ वातावरण असून त्यामुळे मराठवाड्यात काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह गारा पडण्याची तसेच दक्षिण कोकणात काही ठिकाणी पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे.
उष्णेतच्या लाटा व त्यानंतर अवकाळी पाऊस असे चक्र सुरू झाले आहे. आतापर्यंत कोकणात तापमान वाढले नव्हते. मात्र गुरुवारपासून कोकणातील बहुतांश ठिकाणी तापमापकारील पारा वर चढण्यास सुरुवात झाली. मुंबई व आजुबाजूचा परिसरही त्याला अपवाद नव्हता. एप्रिल महिन्यात आतापर्यंत ३२ ते ३३ अंश से. दरम्यान झुलत असलेला पारा शुक्रवारी थेट ३६.८ वर जाऊन पोहोचला. गेल्या महिन्यात २३ तारखेला तापमान ३८.२ अंश से. पर्यंत गेले होते. हवेतील बाष्पाची कमतरता हे तापमानवाढीचे एक कारण आहे. संध्याकाळी पाच वाजता कुलाबा येथे ४६ टक्के तर सांताक्रुझ येथे केवळ २५ टक्के सापेक्ष आद्र्रता होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 3:01 am

Web Title: temperature increase of mumbai
Next Stories
1 सुवर्ण खरेदीचा मुहूर्त नाहीच!
2 नववर्षी घरोघरी उत्साहाचे तोरण
3 ‘विचारशील होण्यासाठी लिहिणे आवश्यक’
Just Now!
X