नैर्ऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास पूर्ण होत असताना मुंबई  शहर आणि उपनगरातील तापमानात वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठवडाभरात तापमानातील वाढ सातत्याने टिकून असून, पुढील दोन ते तीन दिवस चढय़ा तापमानाचे असण्याची शक्यता आहे.

पावसाच्या परतीच्या प्रवासामुळे वाऱ्यांची दिशा पूर्वेकडून उत्तरेकडे आहे. त्याच वेळी आद्र्रतेचे प्रमाणदेखील अद्याप कमी झाले नाही. परतीचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर हे प्रमाण कमी होण्यास काही कालावधी अपेक्षित असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कमाल आणि किमान तापमानात सध्या सुमारे १० अंशाचा फरक आहे.

गेल्या आठवडय़ात पाऊस थांबल्यापासून मुंबई शहर आणि उपनगरात कमाल आणि किमान तापमानात एकदम वाढ झाली.