महिला प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन रक्षाबंधनापासून म्हणजेच २९ ऑगस्टपासून राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वात आलिशान अशा शिवनेरी बसमध्ये महिला प्रवाशांसाठी पुढची १० आसने राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. ३ ते १२ अशी आसने आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर ही योजना लागू करण्यात येणार असून ठाणे-पुणे, मुंबई-पुणे, नाशिक-पुणे, पुणे-औरंगाबाद मार्गावरील महिला प्रवाशांना याचा लाभ होईल.