13 November 2019

News Flash

कुर्ला येथे तणाव

कुर्ला येथे दोन गटात मालमत्तेच्या वादातून बुधवारी पवित्र मूर्ती बाहेर फेकून दिल्याप्रकरणी तणाव निर्माण झाला होता.

| April 30, 2015 01:39 am

कुर्ला येथे दोन गटात  मालमत्तेच्या वादातून  बुधवारी    पवित्र मूर्ती बाहेर फेकून दिल्याप्रकरणी तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तेक्षप करुन या संबंधित व्यक्तीला अटक केली आहे. या घटनेमुळे कुर्ला येथे काही काळ तणाव पसरला होता. मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
घराच्या जागेवरुन दोन गटातील व्यक्तींमध्ये वाद होता. शुक्रवारी ही व्यक्ती जबरदस्तीने घराचा ताबा घेण्यासाठी आली. ज्याच्या घराचा ताबा घेण्यात येणार होता, त्याच्या घराच्या बाजूस असलेल्या क्रीडामंडळात  पवीत्र मूर्ती आणि प्रतिमा होत्या. घराचा ताबा घेताना या बाहेर फेकल्या गेल्याने येथे ताण निर्माण झाला होता.  

First Published on April 30, 2015 1:39 am

Web Title: tension in kurla
टॅग Tension