डॉ. बॉम्ब अशा नावाने ओळखला जाणारा कुख्यात दहशतवादी जलीस अन्सारी याची मुंबईच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. पॅरोलवर असताना फरार झालेल्या जलीस अन्सारीला कानपूरमधून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आलं असून त्याची रवानगी मुंबईतील्या तुरुंगात करण्यात आली आहे. जलीस अन्सारीला तूर्तास आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. आर्थर रोड तुरुंगातून त्याची रवानगी अजमेरच्या मध्यवर्ती तुरुंगात करण्यात येणार आहे.
शुक्रवारी मुंबईतल्या घरातून जलीस अन्सारीने पळ काढला होता. त्यानंतर त्याला कानपूरहून अटक करण्यात आली. आता लवकरच त्याची रवानगी अजमेर येथील तुरुंगात करण्यात येणार आहे. 50 पेक्षा जास्त बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग होता. त्यामुळे त्याला डॉ. बॉम्ब असेही संबोधत. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातही त्याचा सहभाग होता.
अन्सारी हा मागील काही महिन्यांपासून अजमेरच्या तुरुंगात होता. त्यानंतर तो जेलमधून पॅरोलवर बाहेर आला होता. अन्सारी आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मोमीनपुरा येथे राहणारा आहे. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राजस्थानातील अजमेर या ठिकाणी असलेल्या तुरुंगातून अन्सारी 21 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला आणि फरार झाला. मात्र त्याला कानपूरमधून अटक करण्यात आली असून त्याला सध्या आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 20, 2020 9:15 pm