राज्यातील करोना विषाणूच्या सर्व संशयित रुग्णांचे तपासणी अहवाल नकारात्मक  आले असून रुग्णांना घरी सोडण्याची प्रक्रिया शनिवारी सुरू करण्यात आली आहे.

३१ जानेवारीपर्यत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधित भागातून आलेल्या ५,१२८ प्रवाशांची तपासणी करण्यात आली.

मुंबई,पुणे, नागपूर आणि नांदेड मध्ये आतापर्यंत १५ जणांत सौम्य, सर्दी, ताप अशी लक्षणे दिसल्याने त्यांना वैद्यकीयॉ निरीक्षणाखाली ठेवले होते. या सर्वाचे तपासणी अहवाल नकारात्मक असल्याची माहिती राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने(एनआयव्ही)दिली आहे.

मदतीसाठी १०४ क्रमांक : करोना संदर्भात नागरिकांच्या मदतीसाठी १०४ हा मदत क्रमांक कार्यान्वित केलेला आहे. तसेच पुणे येथील आरोग्य सेवेच्या इमारतीमध्ये करोना नियंत्रण कक्षही स्थापन केला आहे.