ठाण्यातील एका डान्सबारवर छापा टाकण्याच्या कारवाईत हयगय केल्याने संबंधित पोलीस ठाण्यातील तीन पोलीस अधिकाऱयांचे निलंबन करण्यात आले आहे.
यात वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक जगताप, सहाय्यक पोलीस आणि एका हवालदाराचा समावेश आहे.
मुंबई पोलिसांना ठाण्यातील एका डान्सबार मध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच याठिकाणी मुंबई पोलिसांच्या सामाजिक शाखेने छापा टाकला. यात एकूण ५७ मुलींची सुटका करण्यात आली तसेच १४ जणांना अटक करण्यात आली. मात्र, डान्सबारच्या मालकाने तेथून पळ ठोकला.
या डान्सबारमध्ये वैश्या व्यवसाय सुरू असल्याची तक्रार एका ‘एनजीओ’ने तेथील स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल केली होती. परंतु, तेथील पोलीस अधिकाऱयांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर या एनजीओने मुंबई पोलिसांच्या सामाजिक शाखेची मदत घेतली. याप्रकरणाची ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना माहिती मिळताच तेथील संबंधित पोलीस ठाण्यातील तीन पोलीस अधिकाऱयांचे कारवाईसाठी हयगय बाळगल्यामुळे निलंबन केले.