News Flash

ठाण्याला बारवीचा जलदिलासा..!

वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात जलसाठे अपुरे असल्याने जानेवारीपासूनच पाणीटंचाई सोसावी लागणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ाच्या शहरी भागांना यंदा बारवी धरणातील वाढीव जलसाठय़ामुळे दिलासा मिळणार आहे.

| May 22, 2014 04:19 am

वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात जलसाठे अपुरे असल्याने जानेवारीपासूनच पाणीटंचाई सोसावी लागणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ाच्या शहरी भागांना यंदा बारवी धरणातील वाढीव जलसाठय़ामुळे दिलासा मिळणार आहे. पुनर्वसनाच्या प्रश्नावरून तब्बल दहा वर्षे रखडलेला बारवी विस्तारीकरण प्रकल्प यंदा प्रत्यक्षात मार्गी लागत असून येत्या पावसाळ्यानंतर धरणात ४० टक्के अधिक जलसाठा होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि मिरा-भाईंदर या टंचाईग्रस्त शहरांवरील पाणी कपातीचे संकट दूर होणार आहे. सध्या या भागात आठवडय़ातून एक दिवस पाणी पुरवठा बंद असला तरी प्रत्यक्षात कमी दाब आणि असमान वितरणामुळे नागरिकांना दोन दिवस पाणीटंचाई सोसावी लागते.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे हे धरण पूर्ण भरले की १७१ दशलक्ष घनमिटर जलसाठा असतो. विस्तारीकरण योजनेत धरणाची उंची सहा मिटरने वाढविल्याने आता त्यात जवळपास दुप्पट म्हणजेच ३४७ दशलक्ष घनमिटर जलसाठा होणार आहे. दीड वर्षांपूर्वी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन पॅकेजसंदर्भात समाधानकारक तोडगा निघाल्याने धरण विस्तारीकरण प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला होता. मात्र तरीही काही ग्रामस्थांचा विरोध होता. त्यामुळे कामास गती नव्हती. त्यांची समजूत काढेपर्यंत आचारसंहिता लागली. मात्र आता विस्तारीकरण प्रकल्पाने वेग घेतला असून धरणात क्षमतेपेक्षा किमान ४० टक्के अधिक जलसाठा होईल, असा विश्वास संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदा शंभर टक्के भरल्यानंतर बारवी धरणात २४० दशलक्ष घनमिटर जलसाठा होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 4:19 am

Web Title: thane gets barvi water
Next Stories
1 शीळ येथे दरोडय़ाचा डाव उधळला
2 उल्हासनगर महापालिकेच्या पाच माजी उपायुक्तांविरोधात गुन्हा
3 भाजपला जास्त जागा हव्यातच
Just Now!
X