ठाणे पश्चिम येथील टिपटॉप प्लाझा येथे विद्यालंकार प्रस्तुत आणि आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ुशन्सच्या सहकार्याने आयोजित ‘लोकसत्ता- मार्ग यशाचा’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ आणि १९ जून रोजी हा परिसंवाद रंगणार आहे. दहावी-बारावीनंतरच्या विविध विद्याशाखांच्या अभ्यासक्रमांची आणि करिअर निवडीच्या तंत्रांची सविस्तर ओळख या दिवसभराच्या परिसंवादातून करून देण्यात येईल.
या परिसंवादाच्या सुरुवातीच्या सत्रात पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या करिअरविषयक विभागाच्या प्रमुख नीलिमा आपटे ‘करिअर निवडताना..’ या विषयावर मार्गदर्शन करतील. त्यानंतर  ‘करिअरमधील सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व आणि विकास’ या विषयावर कॉर्पोरेट ट्रेनर गौरी खेर यांचे व्याख्यान होईल. त्यानंतर ‘दहावी-बारावीनंतरचे अभ्यासक्रम आणि करिअर संधी’ या विषयावर ज्येष्ठ करिअर समुपदेशक विवेक वेलणकर मार्गदर्शन करतील. परिसंवादासोबतच या ठिकाणी शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले आहे. या प्रदर्शनात आघाडीच्या विविध शिक्षणसंस्था सहभागी झाल्या आहेत. डोंबिवली नागरी सहकारी बँक या कार्यक्रमाची ‘बँकिंग पार्टनर’ आहे.
१८ आणि १९ जून या दोन्ही दिवशी वक्ते आणि त्यांच्या वक्तव्याचा विषय सारखाच असेल. या दोन्ही दिवसांपैकी कुठल्याही एके दिवशी उपस्थित राहण्यासाठी प्रतिव्यक्ती ५० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. यात उपस्थितांना दुपारचा लंच बॉक्सही दिला जाईल.

काय?
‘लोकसत्ता- मार्ग यशाचा’ परिसंवाद
कुठे?
टिपटॉप प्लाझा, ठाणे पश्चिम
कधी?
१८ व १९ जून रोजी
सकाळी ९ ते सायंकाळी ५ दरम्यान.

*या कार्यक्रमाच्या प्रवेशिका ११ जूनपासून पुढील ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध आहेत.
*हॉटेल टिपटॉप प्लाझा, ठाणे (प.).
*विद्यालंकार- ईशान आर्केड, तिसरा मजला, हनुमान मंदिरासमोर, गोखले रोड, ठाणे (प.).
*लोकसत्ता कार्यालय, दुसरा मजला, कॉसमॉस बँकेच्या वर, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (प.)
*(अधिक माहितीसाठी ०२२- ६७४४०३६९/३४७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.)