30 September 2020

News Flash

हायकोर्टाचा दणका!, ठाण्यातील नवीन बांधकामांना बंदी

ठाणे महापालिकेला आदेश

मुंबई उच्च न्यायालय (संग्रहित छायाचित्र)

ठाणे येथील घोडबंदर रोड परिसरातील नवीन बांधकामांवर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. बांधकामे थांबवू शकतात पण माणसे पाण्याविना जगू शकत नाहीत, असे निरीक्षणही न्यायालयाने हा निर्णय देताना नोंदवले आहे.

ठाणे शहरातील अनेक परिसरांतील नागरिकांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागते. काही भागांत पाणीकपातही केली जाते. नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. ठाणे महापालिकेकडूनही पुरेशी तरतूद केली जात नाही. मात्र, महापालिकेकडून नवीन बांधकामांना परवानगी दिली जात आहे. बांधकामांसाठी खूप पाणी लागते. त्यामुळे पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी घेण्यात आली. बांधकामे थांबवली जाऊ शकतात. पण माणसे पाण्याविना जगू शकत नाहीत, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान नोंदवले. तसेच ठाणे घोडबंदर परिसरातील नवीन बांधकामांना बंदी घालण्याचा निर्णय दिला. ९ जूनपर्यंत महापालिकेकडे आलेल्या नव्या बांधकामांच्या प्रस्तावांना सीसी (मंजुरी प्रमाणपत्र) आणि बांधकामे पूर्ण झालेल्या बांधकामांना ओसी (भोगवटा प्रमाणपत्र) देऊ नये, असे आदेश ठाणे महापालिकेला दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 6:29 pm

Web Title: thane new constructions stop says bombay highcourt to thane muncipal corporation
Next Stories
1 ‘मेट्रो-३’मधील अडथळा दूर, झाडे तोडण्यास हायकोर्टाची परवानगी
2 आता पंतप्रधानांनीच तूर डाळीचा प्रश्न सोडवावा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी
3 Nitesh Rane : … नाहीतर आम्हाला वस्त्रहरण करावे लागेल, नितेश राणेंचा सेनेला टोला
Just Now!
X