औद्योगिक विकास महामंडळाने ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचे तर महावितरण कंपनीने फिडरच्या देखभाल दुरूस्तीचे काम हाती घेतल्यामुळे शुक्रवारी वागळे इस्टेट व कोलशेत भागातील पाणी, वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
शुक्रवारी सकाळी ९ ते शनिवार सकाळी ९ या कालावधीत वागळे इस्टेट, कळवा, विटावा, बेलापूर रोड, मुंब्रा, मुंबई-पुणा रोड, खारेगाव, घोडबंदर रोड, बाळकुम, कोलशेत, दिवा आदी भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच पुढील दोन दिवस कमी दाबाने या भागात पाणीपुरवठा होणार आहे. महावितरण कंपनीने वागळे इस्टेट आणि कोलशेत या उपविभागातील फिडरच्या देखभाल दुरूस्तीचे काम शुक्रवारी हाती घेतले आहे. त्यामुळे  कोलशेत भागातील मनोरमानगर, कोलशेत वरचा गाव, कोलशेत खालचा गाव, वृज ग्रीन, ढोकाळी नाका, पोमल इंडस्ट्रीयल इस्टेट, गीता इंजिनिअरींग एरीया आदी भागातील वीज पुरवठा सकाळी १० ते सायंकाळी ५पर्यंत बंद राहणार आहे.