20 September 2020

News Flash

ठाण्यात मंगळवारी पाणी नाही

देखभाल, दुरुस्तीच्या कारणास्तव येत्या मंगळवारी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा योजनेतून ठाणे शहराला २१० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा

| September 20, 2014 01:41 am

देखभाल, दुरुस्तीच्या कारणास्तव येत्या मंगळवारी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.  महापालिकेच्या पाणी पुरवठा योजनेतून ठाणे शहराला २१० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होत असतो. या योजनेच्या देखभाल, दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने मंगळवारी २३ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते बुधवार २४ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ असा २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यानंतर पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाईल.
एमआयडीसी तसेच ‘स्टेम’ प्राधिकरणाकडून मिळणारे पाणी सुरु  रहाणार असल्याने कळवा, मुंब्रा, खारेगाव भागातील पाणी पुरवठा नियमित सुरु राहीले, असे पाणी पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
प्रभावित क्षेत्रे
ठाणे शहर, पाचपाखाडी, ऋतुपार्क, साकेत, महागिरी, नौपाडा, उथळसर, वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, इंदिरानगर, श्रीनगर, शास्त्रीनगर, सुरकरपाडा, जॉन्सन, इटर्निटी, सिध्देश्वर, वृंदावन, श्रीरंग, चरई, कळवा, खारेगांव रेतीबंदर, मुंब्रा, समतानगर, गांधीनगर, घोडबंदर रोड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, माजिवडा, बाळकुम, मानपाडा, ढोकाळी, कोलशेत, ब्रह्मांड, पवारनगर, टिकुजिनीवाडी, विजयनगरी, घोडबंदर रोड व खारटन रोड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2014 1:41 am

Web Title: thane water cut
Next Stories
1 मुंबई विद्यापीठात ऑक्टोबर परीक्षा ५ नोव्हेंबरपासून
2 मराठीची भक्ती, पण इंग्रजीची सक्ती!
3 भाजपला सेनेचा ठेंगा!
Just Now!
X