अभिनेत्री कंगना रणौतला मुंबई हायकोर्टाने दिलासा दिल्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “अभिनेत्री कंगनाने मुंबई पोलिसांना माफिया म्हटलं आणि मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. कंगनाला कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर उत्साही झालेल्या भाजपाला हे मान्य आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. कोर्टाच्या निर्णयाविरोधात किंवा न्यायाधीशांविरोधात काही बोलणं हा कोर्टाचा अवमान ठरतो. पण मग महाराष्ट्र आणि मुंबईबाबत कुणी अशी वक्तव्य करत असेल तर ती बदनामी नाही का?” असाही प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

अभिनेत्री कंगना रणौतविरोधात महापालिकेकडून करण्यात आलेली कारवाई सूडबुद्धीने असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. यासोबतच कंगनाला पालिकेकडून पाठवण्यात आलेली नोटीस रद्द करण्यात आली आहे. महापालिकेकडून कंगनाच्या जुहू येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. कंगनाने संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप करत मुंबईचा पाकव्याप्त काश्मीर म्हटलं होतं. त्यानंतर कंगना विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला होता. त्यानंतर महापालिकेकडून ही कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई आपल्या वक्तव्याविरोधात असल्याचं सांगत कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी आज न्यायालयाने निर्णय दिला आहे.

त्यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री कंगनाने मुंबई पोलिसांना माफिया म्हटलं आणि मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. कंगनाला कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर उत्साही झालेल्या भाजपाला हे मान्य आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. कोर्टाच्या निर्णयाविरोधात किंवा न्यायाधीशांविरोधात काही बोलणं हा कोर्टाचा अवमान ठरतो. पण मग महाराष्ट्र आणि मुंबईबाबत कुणी अशी वक्तव्य करत असेल तर ती बदनामी नाही का? असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.