जहाँगीर आर्ट गॅलरीच्या स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका असलेले चित्रकार सावळाराम हळदणकर मुंबईतल्या आर्ट डिस्ट्रिक्टमधल्या अनेक चमकत्या ताऱ्यांपैकी एक होते. ही आर्ट डिस्ट्रिक्ट गुणवंतांनी इतकी समृद्ध होती की या सर्व व्यक्ती आज असत्या तर पाच दहा भारतरत्न या भागातच मिळाली असती असं म्हटलं जातं. हळदणकरांचं ग्लो ऑफ होप हे चित्र तर इतकं अप्रतिम आहे, की दक्षिण भारतातल्या एका संग्रहालयात ते असून अनेकांना ते राजा रविवर्मांचं असल्याचं वाटतं. पण ते रविवर्मांचं नसून हळदणकरांचं आहे. विशेष म्हणजे हे चित्र त्यांना त्यांच्या मुलीला दरवाजात बघून स्फुरलं व त्यांनी ते तिथंच चितारलं.