सीएसएमटी येथील कोसळलेल्या पादचारी पुलाची जबाबदारी रेल्वे मंत्रालयाने झटकली आहे. हा पूल महापालिकेच्या आखत्यारितील असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. तर दुसरीकडे महापालिकेचे स्थानिक नगरसेवकांनी या दुर्घटनेला रेल्वेच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. यावरुन याची जबाबदारी एकमेकांच्या अंगावर ढकलण्याचा प्रकार सुरु झाला आहे.

दरम्यान, या दुर्घटनेतील जखमींना सर्व प्रकारची मदत पुरवण्यात येत असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. रेल्वेचे डॉक्टर्स आणि अधिकारी महापालिकेला या बचाव आणि मदत कार्यात सहकार्य करीत असल्याचेही रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.